Kafala System: भारतीय कामगारांसाठी दिलासादायक बातमी! सौदी अरेबियाने 'कफाला' सिस्टम केली रद्द (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Saudi Arabia Kafala System : रियाध : भारतीय कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सौदी अरेबियाने (Saudi Arabia) एक मोठा मानवतावादी निर्णय घेतला आहे. यामुळे कामगारांना आता सौदीत काम करण्याची नवी संधी मिळणार आहे. सौदीने कफाला सिस्टम रद्द केली आहे. जून २०२५ मध्ये हा निर्णय घेण्यात आला.
व्हेनेझुएलात भीषण दुर्घटनात! टेक ऑफनंतर काही क्षणातच विमान कोसळले आणि घडला स्फोट, VIDEO
सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी व्हिजन २०३० धोरणांतर्गत अधिकृतपणे कफाला सिस्टम रद्द केली आहे. ही सिस्टम गेल्या अनेक दशकांपासून परदेशी कामगारांसाठी अडचणीची ठरत होती. पण आता ही सिस्टम रद्द झाल्याने जवळपास १.३४ कोटी कामगारांना, आणि यातील २५ लाख भारतीयांना याचा फायदा होणार आहे.
कफाला सिस्टम गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. या सिस्टमनुसार परदेशी कामगारांना स्थानिक स्पॉन्सरच्या परवानगीशिवाय काम मिळवणे, नोकरी बदलणे किंवा देश सोडता येणे शक्य नव्हते. स्पॉन्सर्सकडे त्यांचा व्हिसा, रेसिडेन्स परवाना आणि प्रवसाच्या परवानग्या असायच्या यामुळे अनेक स्पॉन्सर्स कामगारांचे पासपोर्ट जप्त करायचे, पगार थांबवायचे आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करुन घ्यायचे. या सिस्टमला गुलामी म्हणून आंतरराष्ट्रीय संस्थांनी संबोधले होते.
परंतु आता ही सिस्टम रद्द करण्यात आली आहे. आता नव्या कायद्यानुसार, सर्व प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक असणार आहे. कामगारांना त्यांच्या कराराच्या कालावधी पूर्ण केल्यानंतर तसेच योग्य नोटीस मिळाल्यानंतर स्पॉन्सर्सच्या परवानगीशिवाय नोकरी बदलता येणार आहे. तसेच देश सोडण्यासाठी किंवा परतण्यासाठी परवाना आवश्यक राहणार नाही. सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने एका पोर्टलद्वारे केली जाणार आहे. यामुळे स्पॉन्सर्सच्या मनमानी, कामगांचे शोषण कमी होईल.
भारतीयांसाठी सौदीचा हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. यामुळे भारतीयांना कोणताही अन्याय सहन करावा लागणार नाही. त्यांचे पासपोर्ट जप्त केले जाणे, किंवा देशाबाहेर जाण्यास कोणत्याही स्पॉन्सरने रोखल्यास दंड आकारला जाणार आहे. यामुळे भारतीय कामगारांना सुरक्षितात आणि न्यायपूर्ण कामाचे वातावरण आणि योग्य पगाराच्या संधी मिळणार आहेत.
सौदी अरेबियाला काय फायदा?
शिवाय निर्णयामुळे सौदी अरेबियात गुंतवणूक वाढेल आणि पारदर्शकता निर्माण होईल. तसेच सौदीला मानवाधिकारिष्ठ देश म्हणून ओळखला जाईल. तसेच परदेशी कौशल्य भांडवलामुळे सौदीच्या विकासास मोठी मदत होईल.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. सौदी अरेबियाने कोणता निर्णय घेतला आहे?
सौदी अरेबियाने व्हिजन २०३० अंतर्गत कफाला सिस्टम रद्द केली आहे.
प्रश्न २. काय आहे कफला सिस्टम?
कफाला सिस्टमध्ये सौदीत काम करणाऱ्यांचे व्हिसा, रेसिडेन्स परवाना, प्रवसाच्या परवानग्या, नोकरी बदलणे, देश सोडणे यांसारख्या गोष्टी स्पॉन्सर्सच्या नियंत्रणात असायच्या. यामुळे परदेशी कामगारांवर मोठा अन्याय व्हायचा.
प्रश्न ३. भारताला कफला सिस्टम रद्द झालेल्या निर्णयाचा काय होणार फायदा?
सौदीचा हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. यामुळे भारतीयांना कोणताही अन्याय सहन करावा लागणार नाही.
प्रश्न ४. काय आहे सौदीच्या कफाला सिस्टम रद्द करण्यामागचा हेतू?
सौदीच्या कफाला सिस्टम रद्द करण्याचा हेतू म्हणजे, परदेशी कौशल्य भांडवल वाढवणे आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणे आहे.
‘हिंमत असेल तर आमचा समाना करा’ ; दहशतवादी गट TTP च्या प्रमुखाचे असीम मुनीरला उघडपणे आव्हान