इस्लामिक जगताला धक्का! सौदी अरेबियाच्या ग्रॅंड मुफ्ती शेख अब्दुलअझीझ यांचे निधन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Saudi Arabia News in Marathi : रियाध : एक मोठी बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) ग्रॅंड मुफ्ती आणि वरिष्ठ विद्वान परिषदेचे प्रमुख शेख अब्दुलअझीझ बिन अब्दुल्ला यांचे निधन झाले आहे. मंगळवारी (२३ सप्टेंबर) सौदीच्या सरकारी वृत्तसंथेने याची घोषणा केली. शेख अब्दुलअझीझ यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सौदीने दिलेल्या माहितीनुसार, अस्रच्या नमाजानंतर रियाधमध्ये इमाम तुर्की बिन अब्दुल्ला मशिदीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
त्यांच्या निधानने सौदी अरेबियात आणि इस्लामिक देशांमध्ये शोकाकाळ पसरला आहे. शेख अब्दुलअझीझ यांना इस्लाममध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान होते. यामुळे प्रतिष्ठान विद्वान गमवल्याने इस्लामिक जगताला धक्का बसला आहे.
धक्कादायक! विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा अफगाणी मुलगा
शेख अब्दुलअझीझ यांनी २६ वर्षे ग्रॅंड मुफ्तीचे पद भूषवले. त्यांनी इफ्ता यांचे जनरल प्रेसिडेन्सी आणि मुस्लिम लीगच्या सर्वोच्च परिषदेचे प्रमुख पदही भूषवले आहे. 1999 मध्ये शेख अब्दुलअजीज यांनी ग्रॅंड मुफ्तीचा पदाभार स्वीकारला होता. सौदी अरेबियाने दिलेल्या माहितीनुसार, रियामध्ये त्यांच्या अंत्ययात्रेचे आयोजन करण्यात आले होते. रियाधमधील इमाम तुर्की बिन अब्दुल्ला मशिदीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
यावेळी सौदीचे राजा सलमान आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान उपस्थित होते. त्यांनी शेख अब्दुलअजीज यांनी ग्रॅंड मुफ्तीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि सौदीच्या नागरिकांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहे. त्यांच्या जाण्याने इस्लामिक जगत दु:खात बुडाले आहे.
सौदी अरेबियाचे तिसरे ग्रॅंड मुफ्ती
१९९९ मध्ये ग्रँड मुफ्ती अब्दुलअजीज बिन बाज यांच्या निधनानंतर शेख अब्दुलअझीझ बिन अब्दुल्ला यांनी ग्रॅंड मुफ्तीचा पदाभार स्वीकारला होता. ते सौदीचे तिसरे ग्रॅंड मुफ्ती होते.
निधनाचे कारण अस्पष्ट
सध्या ग्रॅंड मुफ्ती आणि वरिष्ठ विद्वान परिषदेचे प्रमुख शेख अब्दुलअझीझ बिन अब्दुल्ला यांचे निधनाचे कारण सौदी अरेबियाने सांगितले नाही.
FAQs(संबंधित प्रश्न)
सौदी अरेबियात कोणाचे निधन झाले आहे?
सौदी अरेबियात तिसरे ग्रॅंड मुफ्ती आणि वरिष्ठ विद्वान परिषदेचे प्रमुख शेख अब्दुलअझीझ बिन अब्दुल्ला यांचे निधन झाले आहे.
वयाच्या कितव्या वर्षी घेतला ग्रॅंड मुफ्ती शेख अब्दुलअझीझ यांनी अखरेचा श्वास?
वयाच्या ८२ वर्षी ग्रॅंड मुफ्ती शेख अब्दुलअझीझ यांनी अखरेचा श्वास घेतला.
ग्रॅंड मुफ्ती शेख अब्दुलअझीझ बिन यांनी अजून कोणते पद भूषवले?
शेख अब्दुलअझीझ यांनी २६ वर्षे ग्रॅंड मुफ्तीचे पद भूषवले. त्यांनी इफ्ता यांचे जनरल प्रेसिडेन्सी आणि मुस्लिम लीगच्या सर्वोच्च परिषदेचे प्रमुख पदही भूषवले आहे