Maharashtra breaking News Marathi (Credit- AI)
31 Jan 2026 12:20 PM (IST)
मध्य पूर्वेतील (Middle East) वातावरण आता ज्वालाग्राही बनले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध आता थेट लष्करी संघर्षात बदलताना दिसत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) होर्मुझच्या सामुद्रधुनीत अचानक ‘लाईव्ह-फायर’ नौदल सराव जाहीर केल्यामुळे अमेरिकन सैन्य आक्रमक झाले आहे. सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रविवारी इराणवर हवाई हल्ल्याची अधिकृत घोषणा करू शकतात, ज्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले आहे.
31 Jan 2026 12:05 PM (IST)
बिऊर (ता शिराळा) च्या अमृतनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर हणमंत पाटील (वय ६) या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.३०) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाला अनेकवेळा फोन लावला तरीही कुणीही फोन उचलला नाही. त्या कारणाने संतप्त हजारोच्या जमावाने वन विभागाचे कार्यालय फोडले.
31 Jan 2026 12:00 PM (IST)
अजितदादांच्या कुटुंबातील व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री होणार असेल, तर ही त्यावर मत व्यक्त करण्याची वेळ नाही, अशी प्रतिक्रीया ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते सकाळी माध्यमांशी बोलत होते. तसेच, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार असल्याच्या बातम्या वाचल्या. पण हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. महाराष्ट्र अजूनही अजित पवार यांच्या निधनाच्या दु:खातून सावरलेला नाही, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
31 Jan 2026 11:50 AM (IST)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेचा शेवटचा सामना तिरुवनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. भारत मालिकेत ३-१ ने आघाडीवर आहे आणि टी-२० विश्वचषकाची तयारी करण्याची ही भारताची शेवटची संधी आहे. इशान किशन दुखापतीमुळे मागील सामना गमावू शकला नाही. किशन चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि चाहते त्याच्या अनुपस्थितीमुळे नाराज होते. आता, सर्वांनाच प्रश्न पडला आहे की किशन तिरुवनंतपुरम येथे होणाऱ्या पाचव्या टी-२० मध्ये सहभागी होईल का. भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी आता किशनच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे.
31 Jan 2026 11:40 AM (IST)
ठाण्यात अपहरणाची एक धक्कदायक घटना समोर आली. तीन महिन्यांच्या मुलीचं अपहरण तिच्या आईच्या डोळ्या देखत मुंब्र्यातून झालं होत. एका बुरखा घातलेल्या महिनेने हे अपहरण केले होते. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सहा दिवसात या लहान बाळाची सुखरूप सुटका केली. त्या बाळाला पोलिसांनी त्याच्या आईच्या कुशीत सुरक्षित सोपवलं आहे. मात्र, या अपहरणामागचे कारण काय? असा सवाल तुम्हाला पडला असेल. याचा अपहरणामागचे कारण धक्कदायक आहे.
31 Jan 2026 11:30 AM (IST)
भारताने ग्लोबल साउथमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी एक मोठे सकारात्मक पाऊल उचलले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) शुक्रवारी (३० जानेवारी २०२६) आफ्रिकी देश सोमालिया आणि लिबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्ली भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी या दोन्ही देशांशी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा केली. व्यापार, उर्जा, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि क्षमता निर्माण यांसारख्या मुद्यांवर या भेटी चर्चा झाली. या वाढत्या सहकार्यामुळे भारताचा ग्लोबल साउथमधील प्रभाव अधिक बळकट होणार आहे. मात्र यामुळे पाकिस्तान आणि चीनला मोठा झटका बसला आहे.
31 Jan 2026 11:20 AM (IST)
तंत्रज्ञान आणि गॅझेट्सचा वापर लक्झरी किंवा शो-ऑफसाठी नाही तर गरजेसाठी करावा, असं अनेकजण म्हणतात. याचेच एक उदाहरण म्हणजे अंतराळवीर सुनीता विल्यम्स. अलीकडेच सुनीता विल्यम्स यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सुनीता विल्यम्स यांच्या हातात मोटोरोलाचा एक स्मार्टफोन आणि हातामध्ये एक वॉच दिसत आहे. सुनीता विल्यम्स Motorola Edge 50 Neo 5G वापर असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. तसेच सुनीता विल्यम्स यांच्या हातामध्ये Garmin Instinct नावाचे घड्याळ दिसत आहे.
31 Jan 2026 11:10 AM (IST)
ऑस्ट्रेलियन ओपनचा दुसरा सेमीफायनल ३० जानेवारी रोजी खेळवण्यात आला. सर्बियाच्या नोवाक जोकोविचने शानदार कामगिरी करत ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये जोकोविचने इटलीच्या यानिक सिन्नरचा ३-६, ६-३, ४-६, ६-४, ६-४ असा पराभव करून जेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. जोकोविच आता त्याचे २५ वे ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे.
31 Jan 2026 10:59 AM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या निर्णयामुळे पवार कुटुंबातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. अजित पवार यांच्या निधनाला चार दिवस उलटत नाहीत तोच सुनेत्रा पवार आज (31 जानेवारी) सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्याचवेळी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत इतकी घाई का करण्यात आली असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
31 Jan 2026 10:51 AM (IST)
१९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियानंतर अफगाणिस्तान आणि इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीत फक्त एकच संघ उरला आहे आणि शर्यतीत फक्त भारत आणि पाकिस्तान उरले आहेत. १९ वर्षांखालील विश्वचषकातील हा हाय-व्होल्टेज सामना रविवार, १ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. तथापि, भारताचा फायदा आहे; टीम इंडियाच्या खात्यात आधीच ६ गुण आहेत आणि त्याचा नेट रन रेट देखील पाकिस्तानपेक्षा खूपच चांगला आहे. सध्या पाकिस्तानच्या खात्यात ४ गुण आहेत. जर पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर त्याला भारतावर मोठा विजय मिळवावा लागेल.
31 Jan 2026 10:43 AM (IST)
पुणे-सातारा महामार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. अपघातप्रवण आणि वेळखाऊ ठरणाऱ्या खंबाटकी घाट परिसरात उभारण्यात आलेला नवा बोगदा (टनेल) आणि व्हायाडक्ट येत्या जून महिन्यापासून सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला होणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील धोकादायक वळणांचा त्रास संपून प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
31 Jan 2026 10:35 AM (IST)
जागतकि राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे, यामागचे कारण म्हणजे व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगज आणि पंतप्रधान मोदींचा शुक्रवारी (३० जानेवारी) झालेल्या संवाद आहे. या संवादानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली असून हा डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या साठी देखील मोठा झटका मानला जात आहे. ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
31 Jan 2026 10:27 AM (IST)
Redmi Turbo 5 सीरीज चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. कंपनीने या स्मार्टफोन सिरीजअतंर्गत दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Redmi Turbo 5 आणि Redmi Turbo 5 Max यांचा समावेश आहे. Redmi Turbo 5 Max डिव्हाईसमध्ये 9000mAh बॅटरी आणि मीडियाटेक डेमेन्सिटी 9500s चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.
31 Jan 2026 10:19 AM (IST)
७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी सामना अधिकाऱ्यांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या भारत-पाकिस्तानच्या हाय-व्होल्टेज सामन्यात रिचर्ड इलिंगवर्थ आणि कुमार धर्मसेना मैदानी पंच असतील. भारताचे नितीन मेनन या स्पर्धेतील त्यांच्या चौथ्या टी-२० विश्वचषकात पंच म्हणून काम पाहणार आहेत आणि भारताचे अनंत पद्मनाभन पंच म्हणून पदार्पण करणार आहेत. आयसीसी एलिट पॅनेलमधील एकमेव भारतीय मेनन यांनी यापूर्वी २०२१, २०२२ आणि २०२४ च्या टी-२० विश्वचषकात पंचगिरी केली आहे.
31 Jan 2026 10:11 AM (IST)
मध्य पूर्वेतील तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. इस्रायलने जून २०२५ मध्ये केलेल्या भीषण हल्ल्यानंतर इराणचा (Iran) अणू कार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, ताज्या उपग्रह प्रतिमांनी (Satellite Images) संपूर्ण जगाला चकित केले आहे. इराणने आपल्या इस्फहान आणि नतान्झ या दोन प्रमुख अणू केंद्रांवरील उद्ध्वस्त भागांवर घाईघाईने नवीन छप्परं आणि आच्छादनं उभारली आहेत. या मूक हालचालींमुळे अमेरिका (America) आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
31 Jan 2026 09:59 AM (IST)
Iran nuclear site satellite images 2026 : मध्य पूर्वेतील तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. इस्रायलने जून २०२५ मध्ये केलेल्या भीषण हल्ल्यानंतर इराणचा (Iran) अणू कार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, ताज्या उपग्रह प्रतिमांनी (Satellite Images) संपूर्ण जगाला चकित केले आहे. इराणने आपल्या इस्फहान आणि नतान्झ या दोन प्रमुख अणू केंद्रांवरील उद्ध्वस्त भागांवर घाईघाईने नवीन छप्परं आणि आच्छादनं उभारली आहेत. या मूक हालचालींमुळे अमेरिका (America) आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
31 Jan 2026 09:42 AM (IST)
मुंबई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून वर्षभरात ५० लाख ९६ हजार ई-चलान जारी करत तब्बल ४९६ कोटींचा दंड ठोठावला आहे. तर गेल्या आठ महिन्यांत ४ कोटी २९ लाख १६ हजार जणांना २ हजार ३३० कोटी ८२ लाखांचा दंड केला. पण, ५४ टक्के दंड वसूली झाली. गेल्या वर्षात मुंबईत २ हजार ६४५ अपघात घडले. त्यात ३६३ जणांचा मृत्यू, तर १ हजार ९७४ जण गंभीर जखमी झाले.
31 Jan 2026 09:03 AM (IST)
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. सध्याच्या स्थिती आमच्यासाठी आव्हानात्मक आहे. जो गेला त्याला परत आणू शकत नाही. कुणी ना कुणी अजित पवार यांची जबाबदारी घेतली पाहिजे, म्हणून हे निर्णय घेतले जात असावेत, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे. ते सकाळी माध्यमांशी बोलत होते.
31 Jan 2026 08:48 AM (IST)
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून सुनेत्रा पवार आज (३१ जानेवारी २०२६) राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत. सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी झाला. त्यांचे माहेर धाराशिवमधील एका प्रतिष्ठित राजकीय घराण्यातील आहे. त्या माजी मंत्री आणि खासदार पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. १९८० मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्याशी झाला. तेव्हापासून त्या पवार कुटुंबाचा आणि बारामतीचा अविभाज्य भाग बनल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. अजितदादांच्या रिक्त झालेल्या पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली असून, त्या आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
या शपथविधी सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. अजित पवारांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळीक वाढली होती.






