PoK मध्ये सत्तापालटाचे संकेत! पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे युती सरकार कोसळणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अन्वरुल हक हे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shabaz Sharif) यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज(PML-N)च्या नेतृत्वाखाली कार्य करते. मीडिया रिपोर्टनुसार, शाहबाज यांच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत PML-N ने पीओकेमधील सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय अधिकृतपण मागे घेतला. यामुळे अन्वरुल हक यांची सत्ता धोक्यात आली आहे. तसेच यावरुन पीओकेमधील पाकिस्तानचा दबदबा देखील कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्याचा उद्देश
POK च्या विधानसभेत एकूण ५३ जागा आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी २७ आमदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. २०२४ च्या निवडणुकीत पीटीआयच्या इम्रान खान यांच्या पक्षाने २६ जागा जिंकल्या होत्याय पण अन्वरुल हक यांनी पीटीआय विरोधात बंड पुकारत स्वत:चा पक्ष स्थापन केला आणि पीटीआयमधील २० सदस्य त्यांच्या पक्षात सामील झाले. यानंतर शाहबाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांनी अन्वरुल यांच्या सरकारा पाठिंबा दिला. पण आता बिलावल भुट्टो यांच्या पीपल्स पार्टीने (PPP)ने पाठिंबा मागे घेतला आहे, तसेच शाहबाज यांच्या PML-N नेही हा निर्णय घेतला आहे. यामुळे अन्वरुल यांच्याकडे अल्पमते राहिली आहे.
सध्या या सर्व घडामोडींमुळे पीओकेमध्ये नवी सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय हालचाली सुरु आहेत. सध्या बिलावल यांचे सरकार सत्तेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शाहबाज यांच्या पक्षाकडे केवळ ८ आमदार आहेत. तर इतर पक्षात केवळ एक. यामुळे या लहान पक्षांच्या मदतीने बिलावल सरकार स्थापन करु इच्छित आहेत.
प्रश्न १. POK मध्ये का सुरु होते आंदोलन?
पीओकेमध्ये अन्वरुल यांच्या सरकारविरोधात आंदोलन सुरु होते. अन्वरुल यांच्यावर भ्रष्टाचार, महागाई आणि व्हीआयपी विरोधात बंड पुकारला होता.
प्रश्न २. POK मध्ये आंदोलनानंतर काय परिस्थिती आहे?
POK मध्ये सध्या निदर्शनानंतर अन्वरुल यांच्या सत्तेचा पाठिंबा पीपील आणि पीएमएल-एन ने काढून घेतला आहे. तसेच नवे सरकार स्थापन केली जाण्याची शक्यात आहे.
पाकिस्तानच्या खतपाण्याने दहशतवाद वाढीला! ISIS देखरेखीखाली या धोकादायक दहशतवादी संघटना आल्या एकत्र






