पाकिस्तानमध्ये अंतर्गत गृहक्लेश; बलुचिस्तानमध्ये शालेय बसवर आत्मघातकी हल्ल्यात चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: एकीकडे पाकिस्तान भारतासोबतच्या तणावात अडकेलेला आहे. तर दुसरीकडे दहशतवादाला आश्रय दिल्यामुळे पाकिस्तान रोज एका संकटाचा सामना करत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बुधवारी एक आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. एका शाळेच्या बसवर हा हल्ला झाला असून यामध्ये चार लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. आर्मी स्कूलच्या बसवर आत्मघाती बॉम्बरने हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे.
असोसिएडेट प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार एका आत्मघातकी हल्लेखोरांनी आर्मी स्कूलच्या शाळेच्या बसला जोरदार धडक दिली. शाळेची बसला मुलांना घेऊन जात असताना स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने धडक दिल्याने भीषण स्फोट झाली. या स्फोटात चार मुलांचा मृत्यू झाला आहे. परंतु मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर ३८ हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना रुग्णलायता दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
A suicide car bomber struck a school bus in restive southwestern Pakistan, killing at least four children and wounding 38 others, a government official said. https://t.co/WezYKZqikr
— The Associated Press (@AP) May 21, 2025
बलुचिस्तानच्या खुझदार जिल्ह्यात हा हल्ला झाला. दरम्यान हा हल्ला कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. परंतु बलोच सेपरेटिस्ट ग्रुपने हा हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी देखील बलुचिस्तान प्रांतातील सुरक्षा अधिकारी आणि नागरिकांना बलोच सेपरेटिस्ट ग्रुपने लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता.
गेल्या काही काळापासून पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अनेक आत्मघातकी हल्ले झाले आहे. दिवसेंदिवस हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामध्ये सुरक्षा अधिकारी आणि नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. तसे पाहिले तर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले, स्फोट नवीन नाहीत. परंतु २०२५ मध्ये सुरुवातीच्या काही काळातच या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर पाकिस्तानचे लष्कर आणि सरकार या हल्ल्यांना थांबवण्यात आणि कमी करण्यात अयशस्वी ठरत आहे. यामुळे बलुचिस्तानच्या लोकांनी पाकिस्तानपासून वेगळे होण्याची मागणी केली आहे.
बलुचिस्तानशिवाय पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातही हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पाकिस्तानच्या काऊंटर टेररिझम डिपार्टमेंटने (CTD) सादर केलेल्या अहवालानुसार, खैबर पख्तूनख्वामध्ये १३७ दिवसांत तब्बल २८४ दहशतवादी हल्ले झाले आहेत. शिवाय खैबर पख्तूनख्वाच्या उत्तर वझिरिस्तान, बानू, डेरा, इस्माइल खान, पेशावर आणि कुर्रम हे भाग दहशतवाद्यांच्या विळख्यात अडकले आहेत. यामुळे खैबर पख्तूनख्वा देखील बलुचिस्तानच्या पावलावर पाकिस्तानपासून वेगळे होण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.