इराण : इराण (Iran) मध्ये हिजाबचा (Hijab) विरोध सुरू झालेलं आंदोलन थांबण्याच नाव घेत नाही आहे. ना सरकार आंदोलकांवर कडक कारवाई करण्यापासून मागे हटताना दिसत आहे. ना आंदोलकांच्या भूमिकेत कोणताही बदल झालाय. महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सुरू झालेल्या निदर्शनांनी आता आंदोलनाचे स्वरूप घेतले आहे. मात्र, या आंदोलनाला चिरडण्याचा इराण सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. इराणमधील एका न्यायालयाने आणखी तीन आंदोलकांना सरकारविरोधात निदर्शने केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे.
[read_also content=”सौदी अरेबियाने पाकिस्तानसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा! दिवाळखोर झालेल्या देशाच्या मदतीला धावून आले प्रिन्स मोहम्मद बिन सलमान https://www.navarashtra.com/world/saudi-arabia-made-a-big-announcement-for-pakistan-will-he-be-able-to-avoid-bankruptcy-nrps-360724.html”]
त्याच्यावर ‘देवाविरुद्ध युद्ध’ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलकांवर इतक्या कडक कारवाईनंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणवर टीकेची झोड उठली आहे. या निदर्शनात सहभागी असलेल्या 2 जणांना अलीकडेच इराणमध्ये फाशी देण्यात आली आहे. निदर्शनादरम्यान सुरक्षा दलाच्या जवानाची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या दोघांपैकी एक अनेक राष्ट्रीय विजेतेपदांसह कराटे चॅम्पियन होता. लोकांना दिल्या जाणाऱ्या या क्रूर शिक्षेबद्दल युरोपियन युनियन, अमेरिका आणि इतर पाश्चात्य देश इराणचा सातत्याने निषेध करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या तीन आंदोलकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांची नावे सालेह मिरहाश्मी, माजिद काझेमी आणि सईद याघौबी आहेत. इस्फहान शहरात सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान सरकार समर्थक मिलिशियाच्या कथित हत्येप्रकरणी तिघांनाही दोषी ठरवण्यात आले होते.
खरं तर, महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराणमधील सरकारविरोधी निदर्शने दडपण्यात सरकार-समर्थित मिलिशिया आघाडीवर आहेत. इराण सरकारच्या या निर्णयांना पोप फ्रान्सिस यांनीही विरोध केला आहे. तीन आंदोलकांना फाशीची शिक्षा दिल्यानंतरही पोपने इराण सरकारला विरोध केला. आंदोलकांना फाशीची शिक्षा दिल्याने जगण्याचा अधिकार धोक्यात आल्याचे ते म्हणाले.
16 सप्टेंबर 2022 रोजी महसा अमिनी या 22 वर्षीय कुर्दिश इराणी महिलेच्या मृत्यूनंतर इराणमध्ये निदर्शने सुरू झाली, ज्याला या आंदोलनाला नंतर देशव्यापी पाठिंबा मिळाला. हिजाब न घातल्यामुळे तिला शिक्षा झाली
12 जुलै 2022 रोजी इराणची अभिनेत्री रोश्नो हिला हिजाब न घातल्यामुळे अटक करण्यात आली होती. अनेक दिवस अत्याचार केल्यानंतर तिला नॅशनल टीव्हीवर माफी मागायला लावण्यात आली.
8 मार्च 2018 रोजी राजधानी तेहरानमध्ये एका महिलेने सक्तीच्या हिजाबला विरोध करत तिचा हिजाब काढून तिने काठीच्या सहाय्याने लटकवला. यासाठी त्या महिलेला 2 वर्षांची शिक्षा झाली. तसेच तीन महिन्यांपर्यंत तिला पॅरोलही मिळाला नाही.
2 फेब्रुवारी 2018 रोजी इराणच्या पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाबशिवाय फिरणाऱ्या 29 महिलांना अटक केली. इराणी पोलिसांनी हा परदेशात राहणाऱ्या इराणी लोकांच्या प्रचाराचा भाग असल्याचे म्हटले आहे.