'युक्रेन युद्ध संपवले तर Trump...' नोबेल स्वप्नाकडे ट्रम्पचे पाऊल? हिलरींच्या विधानाने वाढली उत्सुकता ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Hillary Clinton On Trump : अमेरिकेच्या राजकारणात डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यातील वैर कोणाला लपलेले नाही. २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी क्लिंटन यांचा पराभव केला होता आणि त्यानंतरपासूनच या दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र राजकीय स्पर्धा सुरू आहे. मात्र आता रशिया-युक्रेन युद्धाच्या संदर्भात हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करण्याऐवजी एक धाडसी विधान केले आहे. क्लिंटन यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत स्पष्ट शब्दांत सांगितले की “जर ट्रम्प यांनी कीवमधील एकही भूभाग न सोडता रशिया-युक्रेन युद्ध संपवले, जर ते पुतिनविरुद्ध खंबीरपणे उभे राहू शकले, तर मी त्यांना स्वतः नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करेन.”
हे विधान विशेष ठरते कारण ट्रम्प स्वतः अनेक वेळा नोबेल शांतता पुरस्कारात रस दाखवून बसलेले आहेत. त्यांनी वारंवार म्हटले आहे की त्यांनी विविध देशांतील युद्ध रोखले आहे, त्यामुळे त्यांना शांततेचा नोबेल मिळायला हवा. मात्र यावेळी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेली क्लिंटनच अशी अट घालून आव्हान देत आहेत.
If Donald Trump negotiates an end to Putin’s war on Ukraine without Ukraine having to cede territory, I’ll nominate him for a Nobel Peace Prize myself. https://t.co/SYXKhhLqkS
— Hillary Clinton (@HillaryClinton) August 15, 2025
credit : social media
ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची नुकतीच अमेरिकेतील अलास्का प्रांतात अँकोरेज शहरातील जॉइंट बेस एल्मेनडॉर्फ-रिचर्डसन येथे बैठक झाली. बैठकीच्या आधी ट्रम्प यांनी एअर फोर्स वनमध्ये माध्यमांशी बोलताना आशा व्यक्त केली होती की ही बैठक “खूप चांगली” ठरेल. त्यांनी स्पष्ट केले होते “मला लवकरात लवकर युद्धबंदी पाहायची आहे. मी या हत्याकांडाला थांबवण्यासाठी आलो आहे.” मात्र तीन तास चाललेल्या या चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. युद्धबंदीवर शिक्कामोर्तब झाले नाही आणि रशिया-युक्रेन संघर्ष संपुष्टात आला नाही. अनेक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले नाही, त्यामुळे ही भेट अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरली नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump-Putin Alaska Meeting : पुतिन-ट्रम्प भेटीत भारतच ‘गुप्त घटक’? जाणून घ्या अलास्का चर्चेचं सत्य
जगातील सर्वात मोठा भू-राजकीय प्रश्न ठरलेले हे युद्ध जर ट्रम्प यांच्या प्रयत्नांतून थांबले, तर त्यांचे आंतरराष्ट्रीय महत्त्व प्रचंड वाढेल. अमेरिकन राजकारणातही त्यांची प्रतिमा एका “शांतता स्थापक” नेत्याप्रमाणे उंचावेल. विशेष म्हणजे हिलरी क्लिंटनसारख्या कट्टर विरोधकांनीसुद्धा अशा परिस्थितीत त्यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्याची तयारी दर्शवली आहे. हे विधान अमेरिकन राजकारणातील एक नवे समीकरण उभे करते. जिथे दोन विरोधी ध्रुव मानले जाणारे नेते, एका गंभीर युद्धाच्या संदर्भात, संभाव्य सहमती दर्शवतात. क्लिंटन यांचे हे विधान राजकीय वैराच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय शांततेला प्राधान्य देणारे मानले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्पची ‘राजकीय कारकीर्द’ संपवू शकतात रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन; खळबळजनक व्हिडिओ आणि कागदपत्रे असल्याचा दावा
सध्या युद्धबंदीबाबत काहीही ठोस निकाल लागलेला नसला, तरी क्लिंटन यांच्या विधानामुळे चर्चेचे नवे वळण मिळाले आहे. अमेरिकन जनतेपासून ते जागतिक स्तरावरील राजकीय विश्लेषकांपर्यंत, सर्वांचे लक्ष आता ट्रम्प यांच्या पुढील पावलांकडे लागले आहे. जर ट्रम्प यांनी खरोखरच हे युद्ध संपवले, तर त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो – आणि हेच कदाचित त्यांच्या राजकीय पुनरागमनाचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल