ECFR : ट्रम्पचे फासे पडले उलटे! अमेरिका नव्हे तर चीनलाच बनवतोय ग्रेट; २१ देशांच्या सर्वेक्षणात अजबच अहवाल झाला प्रसारित ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
ECFR 21-country survey Trump China 2026 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे “मेक अमेरिका ग्रेट अगेन” (MAGA) हे ब्रीदवाक्य जगभरात गाजत असले तरी, एका नव्या जागतिक सर्वेक्षणाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘युरोपियन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’ (ECFR) या प्रभावशाली थिंक टँकने केलेल्या २१ देशांच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिका पुन्हा महान होण्याऐवजी चीनला जागतिक महासत्ता बनण्यासाठी आयती संधी मिळत आहे.
या सर्वेक्षणात भारत, अमेरिका, चीन, रशिया, ब्राझील आणि १३ युरोपीय देशांमधील सुमारे २६,००० लोकांनी सहभाग घेतला होता. यातील बहुतांश लोकांचे असे मत आहे की, येणाऱ्या दशकात चीनचा जागतिक प्रभाव प्रचंड वाढणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दक्षिण आफ्रिकेतील ८३%, ब्राझीलमधील ७२% आणि अगदी अमेरिकेतील ५४% लोकांनाही चीनची शक्ती वाढण्याची खात्री वाटत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Secret Pact: अमेरिकेचा विश्वासघात! ट्रम्पला पत्ताच नव्हता अन् इराणने खेळली चाणाक्ष राजनैतिक चाल; थेट इस्राएल-रशियाच्या आशीर्वादाने
अहवालानुसार, ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेने ‘नाटो’ (NATO) आणि युरोपीय मित्रांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे मित्र राष्ट्र दुरावली आहेत. बहुतेक युरोपीय नागरिक आता अमेरिकेला ‘विश्वासार्ह मित्र’ मानत नाहीत. युक्रेनसारखे देश आता मदतीसाठी अमेरिकेऐवजी युरोपियन युनियनकडे पाहत आहेत. दुसरीकडे, रशियामध्ये आता अमेरिकेपेक्षा युरोपला मोठा शत्रू मानले जात आहे, जे ट्रम्प यांच्या रशियाप्रती असलेल्या मऊ धोरणाचे निदर्शक मानले जाते.
📢New report! How is Trump making China great again & what does it mean for Europe? New ECFR survey data shows that Trump’s “America First” approach is pushing states closer to China while reducing fear of the US.
✍️ @markhleonard, Ivan Krastev & @fromTGA.… pic.twitter.com/a1AopkE0Ll — ECFR (@ecfr) January 15, 2026
credit – social media and Twitter
बहुतेक युरोपीय देशांमधील नागरिकांना अशी अपेक्षा आहे की, चीन लवकरच इलेक्ट्रिक वाहने (EV) आणि अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करेल. विशेष म्हणजे, जगाला चीनच्या या वाढत्या वर्चस्वाबद्दल आता पूर्वीसारखी भीती वाटत नाहीये. केवळ दक्षिण कोरिया आणि युक्रेनमध्येच चीनला ‘प्रतिस्पर्धी’ मानले जाते, तर भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत चीनची प्रतिमा ‘मित्र’ म्हणून सुधारत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran protests 2026: इराणमध्ये AI ने घातला धुमाकूळ! आंदोलनाचे बनावटच VIDEO VIRAL; 35 लाख लोकांनी पाहिला ‘खोटा’ हिंसाचार
सर्वेक्षण केलेल्या देशांपैकी भारत हा एकमेव असा देश आहे, जिथे बहुसंख्य लोक अजूनही अमेरिकेला आपला नैसर्गिक मित्र मानतात. भारताचा अमेरिकेच्या मूल्यांवर आणि हितसंबंधांवर अजूनही विश्वास आहे. मात्र, जागतिक स्तरावर अमेरिकेचा प्रभाव वाढेल असे वाटणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ट्रम्प यांच्या व्हेंझुएला आणि ग्रीनलँडमधील हस्तक्षेपाच्या धोरणामुळे ‘मजबूत होण्यापेक्षा लोकांनी आपल्याला घाबरावे’ अशी प्रतिमा तयार झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
Ans: 'युरोपियन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स'ने २१ देशांतील २६,००० लोकांच्या मतांवरून जागतिक सत्तेच्या संतुलनावर काढलेला हा एक सर्वसमावेशक अहवाल आहे.
Ans: ट्रम्प यांची 'अमेरिका फर्स्ट' धोरणे, आंतरराष्ट्रीय करारांतून माघार आणि मित्र राष्ट्रांवर लादलेले निर्बंध यामुळे जागतिक स्तरावर अमेरिकेची विश्वासार्हता कमी झाली आहे.
Ans: तंत्रज्ञान (विशेषतः ईव्ही आणि अक्षय ऊर्जा) आणि अमेरिकेने सोडलेल्या जागतिक नेतृत्वाच्या पोकळीचा फायदा चीनला मिळत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.






