Plane Crashes In Philadelphia Video: अमेरिकेत आणखी एक मोठा विमान अपघात; अनेक घरांना आग, 6 जणांचा मृत्यू ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
फिलाडेल्फिया : बुधवारी(दि. 29 जानेवारी 2025 ) ज्याप्रमाणे अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये विमान अपघात झाला, त्याचप्रमाणे शनिवारी सकाळी (दि. 1 फेब्रुवारी 2025 ) फिलाडेल्फियामध्ये आणखी एक विमान कोसळले. यापूर्वी कॅलिफोर्नियामध्ये विमान अपघात झाला होता. अशाप्रकारे गेल्या महिनाभरात अमेरिकेत तीन मोठे विमान अपघात झाले आहेत. जाणून घेऊया तीन अपघातांची कहाणी, कुठे आणि किती मृत्यू झाले?
फिलाडेल्फिया विमान अपघात
सर्वप्रथम फिलाडेल्फिया विमान अपघाताबद्दल बोलूया. फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया येथे शनिवारी सकाळी एका लहान वैद्यकीय विमानाला अपघात झाला. विमान फिलाडेल्फियाहून मिसूरीला जात होते. या विमानात 6 जण होते. या अपघातात सर्व लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मात्र, दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान कोसळले.
पेनसिल्व्हेनिया शहरातील रुझवेल्ट मॉलजवळ हा अपघात झाला. हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी अनेक घरे आणि दुकाने आहेत. अपघातानंतर विमान आगीचा गोळा बनले. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये विमान खूप वेगाने पडले आणि टक्कर झाल्यानंतर त्याला आग लागल्याचे पाहायला मिळत आहे. अपघाताचा तपास करण्यात येत आहे.
🚨 JUST IN: New video shows another angle of the jet SLAMMING into a Philadelphia neighborhood like a missile
This is NIGHTMARE FUEL. pic.twitter.com/jrZTPLM9Sw
— Nick Sortor (@nicksortor) February 1, 2025
credit : social media
अमेरिकेत आणखी एक विमान कोसळले आहे. फिलाडेल्फिया विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमान कोसळले. आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. वॉशिंग्टनमधील रीगन नॅशनल एअरपोर्टजवळ प्रवासी जेट आणि लष्करी हेलिकॉप्टर यांच्यात झालेल्या टक्करनंतर अवघ्या दोन दिवसांनी ही दुर्घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या अपघातात 67 जणांचा मृत्यू झाला होता.
एका विदेशी वृत्तसंस्थेनुसार, एका शॉपिंग मॉलजवळ विमान कोसळले. विमानाने नॉर्थ-ईस्ट फिलाडेल्फिया विमानतळावरून उड्डाण केले. मात्र, टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात तो क्रॅश झाला. या अपघातामुळे अनेक इमारतींना आग लागली असून अनेक लोक जखमी झाले आहेत. फिलाडेल्फिया आपत्कालीन व्यवस्थापन कार्यालयाने सोशल मीडियावर अपघाताची पुष्टी केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Plane Crash : रहस्य उलगडणार…अमेरिकन विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स सापडला
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो यांनी सांगितले की, या अपघातामागील लपलेल्या कारणाची सखोल चौकशी करू. या घटनेशी संबंधित व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की विमान इमारतीच्या वर कसे पडते आणि क्षणार्धात आगीच्या गोळ्यात बदलते.
जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले
फिलाडेल्फिया अग्निशमन विभाग आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी बचाव कार्यात गुंतले आहेत. आग पसरू नये म्हणून बाधित इमारती रिकाम्या केल्या जात आहेत. गव्हर्नर जोश शापिरो यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून विमान सुरक्षेचे नियम कडक केले जातील असे सांगितले. अपघातानंतर जखमींना चांगल्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मोहम्मद युनूस सरकार घाबरले! डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयाने हजार बांगलादेशींवर संकटांचा डोंगरच कोसळला
दुसरा मोठा विमान अपघात
फिलाडेल्फिया विमान अपघात ही दोन दिवसांत अमेरिकेतील दुसरी मोठी विमान दुर्घटना आहे. नुकत्याच झालेल्या वॉशिंग्टन डीसी विमान अपघातानंतर विमानाच्या सुरक्षिततेच्या उपायांचा अभाव ही घटना अधोरेखित करते. अधिकाऱ्यांनी मदत आणि बचाव कार्य तीव्र केले असून, या दुर्घटनेमागील खरे कारण लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा आहे.