कीव- युक्रेन विरुदधच्या (Russia Ukraine War) युद्धात मोठ्या प्रमाणात सैनिक आणि शस्त्रसाठा असूनही अद्यापही रशियाला युक्रेनवर पूर्ण ताबा मिळवता आलेला नाही. महिनाभराच्या या संघर्षात युक्रेनला मोठे नुकासन सहन करावे लागले असले, तरी आत्मरक्षा करण्यात या देशाने यश मिळवले आहे, असेच म्हणता येईल. या सगळ्या संघर्षात युक्रेन शक्तीच्या स्वरुपात दिसण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तिथे असलेले युक्रेनी नागरिक. रशिया हल्ला करण्याची शंका निर्माण झाल्यानंतर, लगेचच युक्रेनी नागरिकांनी हातातील कामे बाजूला टाकून लष्करी प्रशिक्षण घेण्यास आणि बंदुका चालवण्यास सुरुवात केली होती.
यातील मोठी संख्या ही महिलांची आहे. या महिलांनी आपल्या सैन्याच्या बरोबरीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून रशियन सैन्याच्या नाकी नऊ आणण्याचे काम केले आहे. या युक्रेनी नागरिकांच्या प्रयत्नांमुळेच रशियन सैन्याला युक्रेनमध्ये मोठी मजल मारता आलेली नाही. युक्रेनमध्ये रशियन सैन्याचे मोठे नुकसान या महिला ब्रिगेडने केले आहे.
[read_also content=”तुमच्या कामाची बातमी! लवकरच इंजिनिअरिंग, टेलिकॉम आणि हेल्थ सेक्टरमध्ये १.२ कोटी नव्या नोकऱ्यांची संधी https://www.navarashtra.com/education/good-news-for-job-seekers-soon-new-job-openingsd-in-telecom-health-and-engineering-sector-nrak-259916.html”]
रशिया युक्रेनवर हल्ला करेल, असा अंदाज खूप आधीपासूनच होता. अशा परिस्थितीत देशाने महिला शक्तीवर विश्वास ठेवला. युक्रेनमध्ये हल्ल्यापूर्वी काही महिन्यांआधी महिलांनां बंदुका चालवण्याचे आणि स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. हल्ल्यानंतर आता या महिला योद्ध्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आहे.
वेगवेगळ्या करिअरमध्ये असलेल्या महिलांनी, त्यांच्या नोकऱ्या सोडून अल्प कालावाधीसाठी देशाच्या सैन्यात दाखल होण्याचे पसंत केले आहे. बंदुका चालवणे, स्वसंरक्षण करणे, प्रथमोपचार करणे. याचे ट्रेनिंग त्यांना देण्यात आले आहे. या सैन्यदालत भरती झालेल्या महिला आपली मुलं-बाळं, घर-परिवार सोडून सैन्यात दाखल झाल्या आहेत. सर्वसामान्य युक्रेनी मुली आणि महिलाही देशाच्या सुरक्षेसाठी कठोर सैन्य प्रशिक्षण घेत आहेत.
[read_also content=”यंदाच्या आयपीएलमधून BCCIला तब्बल १६ हजार कोटींची कमाई; टी शर्ट ते टोप्याही मिळवतायत पैसा https://www.navarashtra.com/sports/ipl2022-bcci-earned-more-than-16-thousand-rupees-from-ipl-nrak-259925.html”]