Currency War : डॉलर संकटात? UAE चा अमेरिकेला मोठा इशारा; तेल व्यापारासाठी ‘युआन’चा पर्याय तयार (फोटो सौजन्य: एआय डनरेटेड)
जगात डॉलरचे वर्चस्व टिकून राहण्याचे मुख्य कारण म्हणजे तेलाचा जास्तीत जास्त व्यापार डॉलरमध्ये होतो. जर यूएईसारख्या मोठ्या तेल उत्पादक देशाने चीनच्या ‘युआन ‘मध्ये व्यवहार सुरू केले, तर डॉलरच्या जागतिक शक्तीला मोठा धक्का बसेल, अमिरातीला माहित आहे की अमेरिका कधीही खाडी देशांना चीनच्या जवळ जाऊ देणार नाही, म्हणूनच त्यांनी चीनचे नाव घेऊन अमेरिकेवर दबाव निर्माण केला आहे. इराणने केलेल्या ड्रोन आणि क्षेपणाख हल्ल्यांमुळे दुबई आणि अबु धाबी सारख्या ‘फायनान्शिअल हब’मधून गुंतवणूकदार आपला पैसा काढून घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकन ‘फेडरल रिझर्व्ह ‘साठी यूएईला ‘स्वैप लाईन ची सुविधा देणे सोपे नाही, सामान्यत अमेरिका ही सुविधा फक्त कॅनडा, जपान किया युरोपीय देशासारख्या आपल्या अतिशय जवळच्या मित्रराष्ट्रांनाच देते. मात्र, दुसरीकडे सौदी अरवनेही परिस्थिती बिकट असल्याचे संकेत दिले आहेत, अशा स्थितीत आपल्या जुन्या मित्राला वाचवण्यासाठी अमेरिका डॉलरची तिजोरी उघडते का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
अमेरिका इराण वाद वाढत चालला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या युद्धविराम वाढविण्याच्या घोषणनंतर इराणने शांतता चर्चा करण्यास आणि युद्धविराम वाढविण्यास नकार आला आहे. दुसरीकेड होर्मुझमध्ये प्रचंड तणाव वाढला आहे. याच वेळी काही दिवसांपूर्वी इराणने होर्मुझ (Hormuz) वरुन आक्रमक पवित्रा घेत नुकसान भरपाईची मागणी केली होती. या मागणीवर युएईने संतप्त प्रतिक्रिया देत इराणनेच अरब देशांवरील हल्ल्यासाठी नुकसानीचा हिशोब द्यावा असे म्हटले आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






