पाकिस्तानची गुप्त कारवाई! कराचीत पोलिसांशी चकमकीत ६ दरोडेखोर ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कराचीमध्ये मृत्यूचं तांडव! गुल प्लाझा मॉलच्या भीषण आगीत २६ ठार, अनेक बेपत्ता
कराची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी गुप्त सुत्रांकडून पाक कॉलीनच्या एका इमारतीत दरडोखोरांची टोळून लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारो पोलिसांनी पाक कॉलीनतील दरोडेखोर असलेल्या इमारतीला चारी बाजूंनी घेरले आणि छापेमारी सुरु केली. परंतु दरोडेखोरांनी पोलिसांपासून बचावासाठी त्यांच्यावर गोळीबार केला. याच्या प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील गोळीबार केला. या चकमकीत टोळीतील सहा सदस्य जागीच ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर काही दरोडेखोर पळून गेले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीवरील छाप्यात पोलिसांनी सहा पिस्तूल, एक रायफल, मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि दरोड्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, ही टोळी सिंध प्रांतत वेगवेगळ्या भागांमध्ये दरोडे, हत्या यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय आहे. या टोळीवर कारवाईपूर्वी सहा दिवस आधीच तीन भावांची या टोळीकडून हत्या करण्यात आली होती. यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आली होती. सध्या फरार दरोडेखोरांची शोध सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
दरम्यान याच वेळी पाकिस्तानमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पाकिस्तानच्या पंजबा प्रांतात सरगोधा येथे एक भीषण अपघात घडला आहे. एक ट्रक नियंत्रणाबाहेर गेल्याने पलटी झाला आहे. या अपघातात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले आहे. ट्रकचा वेग जास्त असल्याने आणि खराब रस्त्यांमुळे हा अपघात झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या घटनांमुळे पाकिस्तानच्या कायदा-सुव्यवस्था आणि रस्ता सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनांच्या काही दिवसांपूर्वी कराचीतील प्रसिद्ध मॉल गुल प्लाझाला भीषण आग लागली होती. या आगीत २६ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण कराची हादरले होते.
पाकिस्तान हादरलं! कराचीच्या प्रसिद्ध मॉलला भीषण आग; 3 जणांचा होरपळून मृत्यू, थरारक VIDEO
Ans: काराची येथील पाक कॉलनीत पोलिस आणि दरोडेखोरांची चकमक झाली आहे.
Ans: काराची पोलिसांच्या कारवाईत 6 दरोडेखोर ठार झाले.
Ans: पोलिसांनी सहा पिस्तूल, एक रायफल, मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि दरोड्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन गाड्या जप्त केल्या आहेत.
Ans: पाकिस्तानच्या पंजबा प्रांतात सरगोधा येथे एक भीषण अपघात घडला आहे. एक ट्रक नियंत्रणाबाहेर गेल्याने पलटी झाला आहे.
Ans: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला आहे.






