‘लादेनपेक्षाही भयावह कारवाई’ अमेरिकेचा पाकिस्तानला थेट इशारा; पहलगाम हल्ल्यानंतर युद्धजन्य तणाव शिगेला ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव गंभीर स्तरावर पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी केलेल्या थेट वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. “लादेनच्या हत्येपेक्षाही भीषण कारवाई होणार”, असा थेट इशारा देत व्हान्स यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर कठोर कारवाईचा संदेश दिला आहे.
व्हान्स यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “दहशतवादाला समर्थन देणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही.” त्यांनी भारताला सूचित केले की, पाकिस्तानातील दहशतवादी तळांचा शोध घेऊन त्यांचा निर्दयपणे खात्मा करणे ही वेळेची गरज आहे. या कारवाईचे महत्त्व ओसामा बिन लादेनच्या हत्येपेक्षाही अधिक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, व्हान्स यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट युद्ध होऊ नये असे मतही मांडले. त्यांच्या मते, थेट संघर्ष टाळण्यासाठी, प्रेसिशन स्ट्राईक आणि लक्ष्यित कारवाया हाच योग्य पर्याय आहे. ते म्हणाले, “भारताला अमेरिका, इस्रायलसारखी क्षमता असून, तोही सीमा ओलांडून टप्प्याटप्प्याने लक्ष्य करु शकतो.” विशेषतः भारतीय विशेष दलांमध्ये सीमापार कारवाई करण्याची क्षमता आहे. पाकिस्तानच्या पूर्व संमतीशिवायदेखील, गुप्त मोहिमा राबवण्याची क्षमता भारताकडे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हो, आम्हीच दहशतवाद्यांना पोसले…’ ख्वाजा आसिफनंतर बिलावल भुट्टोनेही कबूल केला पाकिस्तानचा गुन्हा
अमेरिकेचे अध्यक्ष जेडी बेन्स यांनी देखील पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानला धडा शिकवण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायालाही यासंदर्भात एकत्र येण्याचे आवाहन केले. पाकिस्तानला आश्रय देणाऱ्या दहशतवादी गटांविरुद्ध जागतिक एकवटलेला दबाव निर्माण करणे, ही अमेरिकेची स्पष्ट भूमिका आहे. अशा घटनांना थोपवण्यासाठी शांततेचा मुखवटा न लावता ठोस कृती आवश्यक असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
1. सीमापार कारवाई – भारताच्या विशेष दलांनी गुप्तपणे सीमापार जाऊन लक्ष्यित दहशतवाद्यांना संपवण्याचा मार्ग स्वीकारावा.
2. स्मार्ट ड्रोन हल्ले – इस्रायलप्रमाणे अत्याधुनिक ड्रोनद्वारे अचूक आणि गुप्त हल्ल्यांची शक्यता.
3. स्थानिक गटांचे सहकार्य – पाकिस्तानमधील टीटीपी किंवा इतर दहशतवादविरोधी गटांचा वापर करून अप्रत्यक्ष कारवाया.
4. टेक-आधारित ट्रॅकिंग – सोशल मीडिया, कॉल इंटरसेप्टिंग व सायबर साधनांचा वापर करून अचूक लोकेशन मिळवणे आणि त्यानंतर कारवाई.
5. सर्जिकल स्ट्राईक + आंतरराष्ट्रीय दबाव – एकीकडे थेट कारवाया तर दुसरीकडे पाकिस्तानवर कूटनीतिक दबाव ठेवणे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : POK मध्ये हमासची उपस्थिती; पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकसोबत मोठा कट रचल्याचा खळबळजनक उलगडा
भारताला युद्ध नको, पण दहशतवाद्यांचा खात्मा अत्यावश्यक आहे – हेच अमेरिकेच्या नव्या धोरणातून स्पष्ट होते. जेडी व्हान्स यांच्या वक्तव्यातून दिसून येते की, अमेरिकेला केवळ निवेदनापुरती भूमिका नको असून, प्रत्यक्ष कारवाईचा धोरणात्मक पाठिंबा द्यायचा आहे. लादेनप्रमाणेच, पण त्याहून भयावह कारवाईची तयारी असल्याचा अमेरिकेचा संदेश पाकिस्तानसाठी गंभीर इशारा ठरतो आहे. त्यामुळे आगामी काळात भारत-पाकिस्तान दरम्यान गुप्त मोहीम, तणाव आणि सामरिक नाट्य वाढण्याची शक्यता प्रबळ होत आहे.