गेल्या सात दिवसापासून इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष सुरु आहे. या युद्धाने दिवसेंदिवसी रौद्र रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मध्य पूर्वेत तणावाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच इराणमधील एका १६ वर्षांच्या अतेफेह मुलीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. या मुलीने इराणला दिलेला शाप खरा ठरत असल्याचे म्हटले आहे. पण असा काय शाप दिला होता अतेफेहने की याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. कोण आहे ही १६ वर्षांची आतेफेह? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अतेफेहला एका मुलाशी अवैध लैंगिक संबंध ठेवण्याच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली होती. तिला क्रूसावर चढवण्यात आले होते. या घटनेने संपूर्ण जग हादरले होते. इराणच्या निर्णयाविरोधात तीव्र निदर्शने झाली होती. अतेफेह सालेह या १६ वर्षांच्या मुलीची आई अपघातात मरण पावली होती. तसेच तिच्या वडिलांना ड्रग्जचे व्यसन लागले होते. अतेफेह तिच्या आजी-आजोबांसोबत राहायची. ती तिचा वेळ घरकामात घालवत असायची. ती दिसायलाही अतिशय सुंदर होती.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, तिच्यावर एका तरुणासोबत अवैध संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. तिला या प्रकरणात अटकही करण्यात आली होती. अतेफेह सालेहच्या विरोधात इस्लामिक कट्टपंथी सरकारने न्यायालयात खटला दाखल केला होता. तिच्याविरोधात खोटे कागदपत्र दाखून तिला २२ वर्षांची प्रौढ तरुणी म्हणून दाखवण्यात आले होते. यामुळे तिला इराणच्या न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.
बीबीसीच्या अहवालानुसार, अतेफेह १३ वर्षांची असताना ती एका मुलासोबत कारमध्ये एकटी अडकली होती. त्यावेळी इस्लामिक कट्टरपंथींयांनी तिच्याविरोधात खटला दखल केला. तिला जन्मठेपेची आणि १०० कोड्यांची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. तुरुंगात तच्यावर सुरक्षा रक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याचेही म्हटले जाते.
तुरुंगातून बाहेर पडल्यावर तिने तिच्यावरील क्रूर अत्याचाराची कहानी जगाला सांगितली. परंतु २००३ मध्ये तिला पुन्हा लैंगिक गुन्ह्यांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, अतेफेह सहलेहने न्यायाधीश हाजी रेझाई यांच्यासमोर तिच्यावर अनेक वर्षे लैंगिक अत्याचार झाल्याचे म्हटले जाते. माजी रिव्होल्यूशनरी गार्डसने तिच्यावर अत्याचार केल्याचे तिने सांगतिले होते. सध्या तिच्या या कहाणीची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. इराणला १६ वर्षांच्या मुलीवर अन्यायाचा शाप लागल्याचे म्हटले जात आहे.