Israel Iran War : इराणने नाकारला होता रशियाच्या ब्रह्मास्त्राचा प्रस्ताव ; ज्याने इस्रायलला प्रत्येक हल्ल्याला केले असते ढेर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Iran War news marathi: इराण आणि इस्रायलमधील युद्ध भयंकर पेटले आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. अशा परिस्थिती मध्य पूर्वेत विनाशाचे मोठे संकट उभे राहिले आहे. जागतिक स्तरावर अनेक देशांनी इस्रायल आणि इराणला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. परंतु दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाहीत.
याच दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे. सध्या इराणला इस्रायली हल्ल्यामुळे गंभीर नुकसान सहन करावे लागत आहे. या परिस्थितीत त्यांना नक्कीच पश्चात्ताप होत असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामागचे कारण म्हणजे, रशियाने इराणला हवाई संरक्षण प्रणालीचा प्रस्ताव दिला होता. परंतु त्यावेळी इराणने रशियाचा हा प्रस्ताव नाकारला होता.
रशियाच्या सरकारी वृत्तसंस्था TASS ने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी म्हटले की, रशियाने इराणला हवाई संरक्षण प्रणालीच्या क्षेत्रात विकास करण्यासाछी प्रकल्प दिला होता. परंतु इराणने याकडे दुर्लक्ष केले होते. यासाठी एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. शिवाय इराणच्या नकारानंतर रशियाने देखील यामध्ये फारसा रस घेतला नाही. पुतिन यांनी म्हटले की, इराणसोबत रशियाची धोरणात्मक भागीदारी अत्यंत कमकुवत आहे.
तसेच पुतिन यांनी म्हटले होते की, रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीमुळे आज इराणला इस्रायलच्या प्रत्येक हल्ल्याला हाणून पाडता आले असले. परंतु त्यांना आमचा प्रस्ताव नाकारला. यामुळे त्यांना नक्कीच पश्चाताप होत असणार.
दरम्यान पुन्हा एकदा सध्या सुरु असलेल्या युद्धात पुतिन यांनी इराणला युद्धविरामासाठी रशियाच्या मध्यस्थीची ऑफर दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मॉस्को दोन्ही देशांना शांतता करारपर्यंत पोहचण्यास मदत करु शकते. तसेच यामुळे इराण देखील शांततेने त्यांचा अणु प्रकल्प विकसित करु शकेल. तसेच इस्रायलची देखील चिंता कमी करण्यात रशिया मदत करु शकतो. असे पुतिन यांनी आंतरराष्ट्रीय पत्रकांराशी बोलताना म्हटले.
पुतिन यांनी पुढे म्हटले की, इस्रायल आणि अमेरिकेला देखील हा प्रस्ताव देण्यात आला आहे. दोन्ही देशांना या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी उपाय शोधता येईल. तसेच इस्रायलच्या राजकीय नेतृत्वाच्या संरक्षणाचा देखील प्रश्न सुटेल असे पुतिन यांनी म्हटले होती.
Israel Iran War: इस्रायल आणि इराणमधील तणावात वाढ; अमेरिकेचे ‘डूम्सडे विमान’ हाय अलर्टवर मोडवर