कोण आहे जब्बार? ज्याने अमेरिकेत गोळीबार करुन माजवली दहशत, जाणून घ्या( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉश्गिंटन: अमेरिकेच्या न्यू ऑर्लियन्स शहरात नववर्षाच्या उत्सवादरम्यान झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. 1 जानेवारी 2025 रोजी बॉर्बन स्ट्रीटवर एका शख्साने पिकअप ट्रकने गर्दीत घुसून गोळीबार केला. या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. हल्लेखोराच्या वाहनामध्ये इस्लामिक स्टेट (IS) चे झेंडे आढळल्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू आहे.
कोण होता शम्सुद्दीन बहार जब्बार
हल्लेखोराची ओळख शम्सुद्दीन बहार जब्बार (42) म्हणून झाली आहे. तो अमेरिकेचा नागरिक होता आणि सैन्यात सार्जेट म्हणून काम पाहिलेला होता. 2007 ते 2015 दरम्यान अफगाणिस्तानात त्याची तैनाती झाली होती, या ठिकाणी तो प्रशासनिक क्लर्क म्हणून काम करत होता. 2020 पर्यंत तो सैन्याचा भाग होता आणि त्याला अनेक सन्मानही मिळाले होते. मात्र, सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्याचा जीवनक्रम बदलला.
शम्सुद्दीनने दोन लग्न केली होती, परंतु दोन्ही लग्न तुटली. त्याची पहिली पत्नी नेकेड्रा चार्ले हिने सांगितले की, इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्याच्या वागणुकीत मोठे बदल झाले. 2022 साली त्याला दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट घ्यावा लागला. त्यावेळी त्याने मोठे कर्ज घेतले होते, ज्यामुळे तो आर्थिक संकटात सापडला.
इस्लाम धर्माचा प्रभाव आणि मानसिक स्थिती
2020 मध्ये यूट्यूबवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये जब्बारने सांगितले होते की, टेक्सासमध्ये त्याचा जन्म झाला आणि सैन्यात सेवा दिल्यानंतर त्याने रिअल इस्टेट क्षेत्रात काम केले. मात्र, 2023 मध्ये त्याचा रिअल इस्टेट परवाना संपुष्टात आला. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्याच्या विचारांमध्ये टोकाचा बदल झाला. त्याच्या वागणुकीत अजीबोगरीबपणा दिसून आला, ज्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनीही त्याच्यापासून अंतर ठेवले.
हल्ल्याचा उद्देश आणि परिणाम
जब्बारने केलेल्या या हिंसाचारामागील कारणांचा शोध घेण्यासाठी सध्या तपास सुरू आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध होते का, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेने अमेरिकन सुरक्षा व्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शम्सुद्दीन बहार जब्बारच्या आयुष्याची वाटचाल सैन्य सेवेतून एक साधा क्लर्क ते हिंसाचार पसरवणाऱ्या व्यक्तीपर्यंत झाली, हे चिंतेचे आणि विचार करण्याजोगे आहे. समाजातील मानसिक आरोग्य, धार्मिक अतिरेकी विचारसरणी आणि वैयक्तिक समस्या यावर त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- “शेख हसीनाला दिल्लीतून…’; बांगलादेशचे भारताबाबत मोठे वक्तव्य