अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये इस्रायलविरोधी निदर्शकांनी केली 'इन्तिफादा क्रांती'ची मागणी( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉश्गिंटन: अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरवर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच इस्त्रायलविरोधात आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनामध्ये तिसऱ्या इंतिफादा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. निदर्शकांनी इस्त्रायलविरोधात पोस्टर्स घेऊन लोक रस्त्यावर उतरले आहेय या पोस्टर्समध्ये “जायोनिझम कर्करोग आहे,” इस्त्रायलविरोधी पोस्टर्स दाखवत “जायोनिझम कर्करोग आहे,” “इस्त्रायल अमेरिकेकडून मिळणारी मदत बंद करा” आणि “इराणविरोधात कोणतेही युद्ध नको” अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.
फक्त एकच उपाय – इंतिफादा
हे आंदोलन पॅलेस्टिनी युवा आंदोलन, पार्टी फॉर सोशलिझम अँड लिबरेशन आणि पीपल्स फोरम या संघटनांनी आयोजित केले होते. न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, निदर्शनकर्त्यांनी “फक्त एकच उपाय – इंतिफादा” असे नारे दिले. काहींनी “आम्हाला गाझाचा अभिमान आहे” असे सांगून गाझा पट्टीवरील संघर्षाला पाठिंबा दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- “शेख हसीनाला दिल्लीतून…’; बांगलादेशचे भारताबाबत मोठे वक्तव्य
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
तसेच यासंबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. एका व्हिडिओमध्ये एका महिला निदर्शनकर्त्याने पाश्चिमात्य लोकांवर टीका करत “तुम्हाला युरोपमध्ये परत पाठवणार,” असे म्हटले. तर एकाने, “2024 हे जायोनिझमच्या अन्यायाविरोधात लढ्याचे वर्ष होते.”
काय आहे इंतिफादा?
इंतिफादा हा अरबी शब्द असून याचा अर्थ ‘शेक ऑफ’ असा होता. म्हणजे जोरदार प्रतिकार असा होतो. पॅलेस्टाईनमध्ये इस्त्रायलच्या विरोधात केलेल्या तीव्र संघर्षाला इंतिफादा म्हणतात. यापूर्वी 1987 मध्ये वेस्ट बॅंक आणि गाझा पट्टीत इस्त्रायली सैन्याविरुद्ध स्थानिक लोकांनी तीव्र विरोध दर्शवला होता.
त्यावेळी या शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. त्यानंतर 1989 मध्ये पॅलेस्टिनी-अमेरिकन प्राध्यापक एडवर्ड सईद यांनी या संकल्पनेची व्याख्या मांडली. त्यांनी सांगितले की, “ही पॅलेस्टिनींनच्या लोकांची स्वतःच्या भूमी, देश आणि इतिहासाचे संरक्षण करण्यासाठी इस्त्रायलविरोधात उचललेले पाऊल आहे.”
तुर्कीमध्येही इस्त्रायलविरोधात आंदोलन
अमेरिकेशिवाय, नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुर्कीच्या इंस्तांबूलमद्ये देखील इस्त्रायलविरोधात मोठे आंदोन काढण्यात आले. गलाटा ब्रिजवर शेकडो लोकांनी “आझाद पॅलेस्टिनी”चे नारे दिले. या आंदोलनाचे आयोजन नॅशनल विल प्लॅटफॉर्मने केले होते. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगन यांच्या मुलाने देखील गाझावरील इस्त्रायली हल्ल्यांचा निषेध केला आहे.
त्यांनी सीरियातील बशर अल असदच्या राजवटीच्या तख्तापलटाचा संदर्भ देताना म्हटले आहे की, “सीरियातील मुस्लिमांनी संघर्ष आणि सहनशीलतेने विजय मिळवला. आता गाझाही इस्त्रायली घेरातून मुक्त होईल.” या प्रदर्शनांनी जागतिक पातळीवर इस्त्रायलविरोधी भावनांना पुन्हा प्रकाशझोतात आणले आहे.