India-Pakistan War : 'आम्ही पाकिस्तानसोबत'; चीनने स्पष्ट केली भूमिका
India-Pakistan War: भारतासोबत सुरू असलेल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने पाकिस्तानला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानकडे असलेल्या एकूण शस्त्रास्त्रांपैकी सुमारे ३६ टक्के शस्त्रे चीनमध्ये उत्पादित झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाल्यास चीनकडून पाकिस्तानला अधिक मदत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात इस्लामाबाद आणि बीजिंगदरम्यान उच्चस्तरीय चर्चा सुरु आहे.
मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. उत्तर कोरियाने चीनच्या सुरक्षेवरच डोळा ठेवत धक्का देणारी कारवाई केली आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्या गुप्तचरांनी चीनच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत संवेदनशील माहिती गोळा केली आहे. ही बाब समोर येताच चीनमध्ये एकच खळबळ उडाली असून, चीनने तत्काळ कारवाई करत एका उत्तर कोरियन गुप्तहेराला अटक केल्याची माहिती आहे.
Maharashtra Politics : पालकमंत्रिपदावरून आदिती तटकरे म्हणाल्या, ‘नाशिकमुळे रायगडच्या…’
स्थानिक माध्यमांनुसार, चीनने उत्तर कोरियाच्या एका गुप्तहेराला अटक केली आहे. हा गुप्तहेर चीनमध्ये बसून लष्करी माहिती गोळा करत होता. या गुप्तहेराकडून चिनी संरक्षण विभागाशी संबंधित अनेक गुप्तचर अहवालही जप्त करण्यात आले आहेत. या घटनेनंतर उत्तर कोरियाने त्या गुप्तहेराशी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना परत बोलावले आहे. उत्तर कोरियाच्या या निर्णयानंतर असे म्हटले जात आहे की हे सर्व किम जोंग उनच्या सूचनेवरून केले गेले का? असा प्रश्न उपस्थित होतआहे.
न्यूजवीकने उत्तर कोरियाच्या लष्करी विभागातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार, संबंधित व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तो आयटी कामगार म्हणून तो चीनमध्ये आला होता. उत्तर कोरियाच्या सरकारनेच त्याला पाठवल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत असल्याचे चीनने म्हटले आहे. तसेच, कोणत्या प्रकारचा डेटा लीक झालाय, हेही शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे चीनने म्हटले आहे.
India-Pakistan War : नापाक पाकिस्तान म्हणतोय हल्ला केलाच
पण दुसरीकडे उत्तर कोरिया हा चीनचा चांगला मित्र समजला जात असताना उत्तर कोरियाने असे का केले, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरियाची सध्या रशियाशी अधिक मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. उत्तर कोरिया हा पहिला देश आहे ज्याने रशियाला उघडपणे पाठिंबा दिला आहे. तर भारत आणि पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून पाहिले तर रशियाने थेट भारताला पाठिंबा दिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पुतिन यांनी दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई करण्याबद्दल चर्चा केल्याचे म्हटले होते. त्यामुळे भारताला अप्रत्यक्ष मदत करण्याच्या दृष्टीकोनातूनच उत्तर कोरियाने असे केले असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे.