JSW Motors Pioneers 500 Limited Edition SUV  (फोटो सौजन्य-AI एआय)
ऑटोमोबाइल

JSW मोटर्सची खास घोषणा! डिसेंबरमधील लाँचपूर्वी 500 युनिट्सची लिमिटेड स्पेशल एडिशन सादर

जेएसडब्ल्यू मोटर्सने Pioneers 500 ही खास लिमिटेड एडिशन SUV जाहीर केली आहे. फक्त 500 युनिट्स तयार होणार असून 28 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता अर्ज सुरू होतील. वैयक्तिक नावाची प्लेट, सीरियल नंबर, खास भेटवस्तू आणि ओनरशिप बेनिफिट्स हे या एडिशनचे आकर्षण असणार आहे.

Atharva Rajopadhye
  • जेएसडब्ल्यू मोटर्सच्या Pioneers 500 एडिशनची फक्त 500 युनिट्स विक्रीसाठी येणार.

  • 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार.

  • मालकाचे नाव, स्वतंत्र सीरियल नंबर आणि खास ओनरशिप बेनिफिट्स मिळणार.

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या जेएसडब्ल्यू मोटर्सने आपल्या पहिल्या SUV संदर्भात एक खास घोषणा केली आहे. कंपनीने 'Pioneers 500' नावाची लिमिटेड एडिशन सादर केली असून या स्पेशल एडिशनच्या फक्त 500 युनिट्सची विक्री केली जाणार आहे. या गाडीसाठी 28 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. इच्छुकांना कंपनीच्या वेबसाईटवरून अर्ज करता येईल.

काय खास असणार Pioneers 500 एडिशनमध्ये?

JSW मोटर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून या स्पेशल एडिशनची माहिती दिली आहे. कंपनीच्या घोषणेनुसार, Pioneers 500 मध्ये काही खास कॉस्मेटिक बदल आणि वैयक्तिक ओळख देणारे फीचर्स मिळणार आहेत. प्रत्येक SUV च्या केबिनमध्ये मालकाचे नाव आणि त्या गाडीचा स्वतंत्र सीरियल नंबर असलेली खास प्लेट दिली जाईल. उदाहरणार्थ, प्रत्येक गाडीवर 500 पैकी तिचा स्वतंत्र क्रमांक नमूद असेल.

याशिवाय या एडिशनसोबत एक खास स्मृतिचिन्ह म्हणजेच एक्सक्लुझिव्ह कीपसेक दिले जाणार आहे. त्यामुळे ही गाडी खरेदी करणाऱ्या कस्टमर्सना केवळ वाहनाची मालकीच नाही, तर एक वेगळा एक्सपिरीयंस मिळणार आहे.

डिसेंबरमध्ये Combat SUV ची एन्ट्री?

कंपनीने शेअर केलेल्या टीझरमध्ये बॉक्सी डिझाइन असलेल्या SUV ची झलक दिसत आहे. ही गाडी जेएसडब्ल्यू मोटर्सची Combat SUV असण्याची शक्यता आहे. कंपनी डिसेंबर 2026 मध्ये या SUV चे पूर्ण सादरीकरण करण्याच्या तयारीत आहे. पण Pioneers 500 एडिशनमधील सर्व बदल, इंजिनचे तपशील, फीचर्स आणि किंमत याबाबतची संपूर्ण माहिती कंपनीने जाहीर केलेली नाही.

या स्पेशल एडिशनचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे मालकांना कंपनीच्या नेतृत्व टीमशी संपर्क साधण्याची संधी मिळणार आहे. यासोबत खास ओनर कम्युनिटीचे मेंबरशिप आणि काही खास ओनरशिप बेनिफिट्सही दिले जातील. या सुविधांसाठी कंपनीच्या कार्यक्रमातील अटी आणि पात्रतेचे निकष लागू असतील.

एकूणच, JSW मोटर्सने आपल्या पहिल्या SUV च्या एन्ट्रीपूर्वीच 500 खास कस्टमर्ससाठी वेगळा अनुभव देण्याची योजना आखली आहे. आता या एडिशनची किंमत आणि Combat SUV चे संपूर्ण तपशील कधी जाहीर होतात, याकडे ऑटोमोबाईल क्षेत्राचे लक्ष असेल.

Bigg Boss 20 : स्काउटने लव गिलबद्दल गुल्लूसमोर केला धक्कादायक खुलासा, बिग बॉस २० चा नवा प्रोमो चर्चेत

Share Market Today: आज कोणते शेअर्स चमकणार? टाटा ग्रुपसह या कंपन्यांच्या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

राज्यातील 7 कोटी फ्लॅटना मिळणार स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड; फ्लॅटवरील बोजे, कायदेशीर अडचणींचीही होणार नोंद

Panch Mahapurush Yog: कुंडलीतील हे ५ महापुरुष योग देतात राजासारखे सुख! जाणून घ्या त्यांचे महत्त्व आणि ज्योतिषशास्त्रीय फायदे

Shraddha Kapoor Marathi Look: ५ लाखांचा चोकर, दीड लाखांची साडी अन्... श्रद्धा कपूरच्या मराठमोळ्या लूकची किंमत ऐकून बसेल धक्का!