Mercedes-Benz China:(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)  
ऑटोमोबाइल

Mercedes-Benz China: चीनमध्ये स्थानिक ऑटो पार्ट्स पुरवठ्यासाठी मर्सिडीज-बेंझ उभारणार नवा संयुक्त उपक्रम

Mercedes-Benz China: मर्सिडीज-बेंझ चीनमध्ये ऑटो पार्ट्सचा स्थानिक पुरवठा मजबूत करण्यासाठी नवीन संयुक्त उपक्रम सुरू करण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम होण्यास, उत्पादन प्रक्रियेला गती मिळण्यास आणि चीनमधील ऑटोमोबाईल बाजारपेठेत कंपनीचे स्थान मजबूत होण्यास मदत होऊ शकते.

siddhi berde
  • मर्सिडीज-बेंझ चीनमध्ये ऑटो पार्ट्सच्या स्थानिक पुरवठ्यासाठी नवीन संयुक्त उपक्रम सुरू करण्याची योजना आखत आहे.

  • स्थानिक पुरवठादारांसोबत भागीदारी केल्यामुळे सुट्या भागांची उपलब्धता आणि उत्पादन प्रक्रियेची कार्यक्षमता सुधारण्याची शक्यता आहे.

  • इलेक्ट्रिक वाहने, आधुनिक तंत्रज्ञान आणि वाढती स्पर्धा यांमुळे चीनमधील ऑटोमोबाईल बाजारपेठ कंपनीसाठी महत्त्वाची ठरत आहे.

जर्मनीतील प्रसिद्ध लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझने चीनमधील व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. चीनमध्ये वाहनांचे सुटे भाग आणि आवश्यक घटकांचा स्थानिक पातळीवर पुरवठा करण्यासाठी कंपनी नवीन संयुक्त उपक्रम (जॉइंट व्हेंचर) सुरू करण्याची योजना आखत आहे.ह्याबदलामुळे या निर्णयामुळे ऑटो पार्ट्स पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या भविष्यातील निर्णयामध्ये अधिक बदल घडेल. चीनमधील ऑटोमोबाईल उद्योगात कंपनीची पुरवठा व्यवस्था अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.भविष्यातील वाढत्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे.

चीन ची निवड करण्यामागचं कोणतं कारण?

चीन ही जगातील सर्वात मोठ्या वाहन बाजारपेठांपैकी एक आहे. येथे इलेक्ट्रिक वाहने, लक्झरी कार आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जागतिक वाहन उत्पादक कंपन्या चीनमधील बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्यासाठी विविध धोरणे आखत आहेत. मर्सिडीज-बेंझनेही याच पार्श्वभूमीवर स्थानिक उत्पादन आणि पुरवठा व्यवस्थेला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे.

नवीन संयुक्त उपक्रमाचे स्थानिक स्तरावर कोणते फायदे आहेत?

नवीन संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून वाहनांसाठी लागणारे विविध ऑटो पार्ट्स स्थानिक स्तरावर उपलब्ध करून घेण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे परदेशातून सुटे भाग मागवण्यावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच स्थानिक पुरवठादारांसोबत समन्वय साधून उत्पादन प्रक्रियेला अधिक गती देता येईल.तसेच भविष्यात ही या उपक्रमामुळे ऑटो पार्ट्स बनवण्याच्या क्षेत्रात गती येईल. वाहने तयार करण्यासाठी आवश्यक असणारे घटक वेळेत उपलब्ध झाल्यास उत्पादनाचे नियोजन करणेही सोपे होणार आहे.

कंपनीला कोणता फायदा होईल?

या निर्णयामुळे कंपनीला पुरवठा साखळीतील खर्च आणि वेळेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर स्थानिक कंपन्यांना जागतिक दर्जाच्या वाहन उत्पादक कंपनीसोबत काम करण्याची संधी मिळू शकते. यामुळे चीनमधील ऑटो पार्ट्स निर्मिती क्षेत्रालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.तसेच अनेक कंपन्या चीनमधील ऑटो पार्ट्स निर्मिती क्षेत्राततही भाग घेतील.

बदलत्या काळाबरोबर हा बदल अधिक महत्वाचा ठरणार आहे?

सध्या जागतिक ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचे वाढते प्रमाण, वाहनांमधील डिजिटल तंत्रज्ञान, आधुनिक सुरक्षा सुविधा आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा यामुळे कंपन्यांना आपल्या उत्पादन धोरणांमध्ये बदल करावे लागत आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेऊन पुरवठा व्यवस्था उभारणे महत्त्वाचे ठरत आहे. मर्सिडीज-बेंझचा हा नियोजित संयुक्त उपक्रम चीनमधील व्यवसाय विस्ताराच्या धोरणाचा भाग मानला जात आहे. स्थानिक भागीदारीच्या माध्यमातून उत्पादन क्षमता आणि पुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यामुळे आगामी काळात चीनमधील वाहन उद्योगातील स्पर्धेत मर्सिडीज-बेंझची भूमिका अधिक महत्त्वाची ठरू शकते.

Google Maps मध्ये मोठा बदल! आता रस्ते दिसणार अधिक स्पष्ट, नेव्हिगेशनचा अनुभव होणार आणखी सोपा

Pramod Mittal : जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबाला लागली उतरती कळा; प्रमोद मित्तल यांच्या लंडन मेफेअरमधील 'त्या' 357 कोटींच्या बंगल्याचा वाद काय?

Mira Bhayandar Water Supply : पाणीटंचाईतून सुटकेची चाहूल! मीरा-भाईंदरकरांना दिलासा! जानेवारीत 'सूर्या'चे 50 ते 60 दशलक्ष लिटर पाणी मिळणार

मूळव्याध समजून शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत आहात? उद्भवू शकतो मोठ्या आतड्यांच्या कॅन्सरचा धोका

Instagram For TV : आता स्मार्ट टीव्हीवरही वापरता येणार इन्स्टाग्राम; एकाच वेळी 5 अकाऊंट्स येतील जोडता