TVS Jupiter One Crore Production Milestone  (फोटो सौजन्य-AI एआय)
ऑटोमोबाइल

TVS Jupiter One Crore Scooter Production: टीव्हीएस ज्युपिटरचा मोठा विक्रम! 13 वर्षांत 1 कोटी स्कूटरचे प्रोडक्शन पूर्ण

2013 मध्ये होंडा अॅक्टिव्हाला टक्कर देण्यासाठी आलेल्या टीव्हीएस ज्युपिटरने आता 1 कोटी युनिट्सचा टप्पा गाठला आहे. 110cc आणि 125cc अशा दोन इंजिन ऑप्शनसह ही स्कूटर कस्टमर्समध्ये लोकप्रिय आहे. जाणून घ्या तिच्या किंमती, फीचर्स आणि विक्रमाची कहाणी.

Atharva Rajopadhye
  • टीव्हीएस ज्युपिटरने अवघ्या 13 वर्षांत भारतात 1 कोटी युनिट्सच्या प्रोडक्शनचा टप्पा पूर्ण केला आहे.

  • मागच्या 4 वर्षांत कंपनीने 50 लाख ज्युपिटर स्कूटर तयार केल्या असून वार्षिक प्रोडक्शन दुपटीहून जास्त झाले आहे.

  • ज्युपिटर 110 मध्ये 113.3cc, तर ज्युपिटर 125 मध्ये iGO Assist सह 124.8cc इंजिन मिळते.

भारतीय टू-व्हीलर मार्केटमध्ये लोकप्रिय असलेल्या TVS Jupiter मोठा टप्पा गाठला आहे. या स्कूटरचे भारतात एकूण 1 कोटी युनिट्सचे प्रोडक्शन पूर्ण झाले आहे. TVS Jupiter 1 Crore Production Milestone हा विक्रम अवघ्या 13 वर्षांत पूर्ण झाला असून, भारतात हा टप्पा गाठणारी ज्युपिटर ही सर्वात कमी वयाची स्कूटर नेमप्लेट ठरली आहे. विशेष म्हणजे, या एकूण प्रोडक्शनपैकी मागच्या 50 लाख स्कूटर तयार करण्यासाठी कंपनीला केवळ 4 वर्षे लागली आहेत.

4 वर्षांत तयार झाल्या 50 लाख स्कूटर

टीव्हीएस मोटर कंपनीने तामिळनाडूतील होसूर येथील आपल्या प्रोडक्शन प्लांटमधून 1 कोटीवी ज्युपिटर स्कूटर बाहेर काढली. कंपनीच्या माहितीनुसार, मागच्या 4 वर्षांतील ज्युपिटरचे वार्षिक प्रोडक्शन याआधीच्या 9 वर्षांच्या सरासरीपेक्षा दुपटीहून जास्त राहिले आहे. यावरून भारतीय कस्टमर्समध्ये या स्कूटरची लोकप्रियता किती वाढली आहे, याचा अंदाज येतो.

2013 मध्ये टीव्हीएसने होंडा अॅक्टिव्हाला स्पर्धा देण्यासाठी ज्युपिटर सादर केली होती. विक्री सुरू झाल्यानंतर पहिल्याच वर्षात 5 लाख युनिट्सचा टप्पा गाठणारी ही सर्वात वेगवान स्कूटर ब्रँड ठरली. पुढे देशांतर्गत स्कूटर मार्केटमध्ये दुसरे स्थान मिळवत ज्युपिटरने 'स्कूटर ऑफ द इयर' पुरस्कारही जिंकला.

ज्युपिटर 110 आणि 125 मध्ये काय आहे खास?

सध्या टीव्हीएस ज्युपिटर 110 ची एक्स-शोरूम किंमत 74,700 ते 90,525 रुपये आहे. ही स्कूटर Drum, Drum Alloy, SmartXonnect Drum, SmartXonnect Disc आणि Dual Tone अशा व्हेरिएंट्समध्ये मिळते. यात 113.3cc इंजिन असून ते 5.9 kW पॉवर आणि 9.8 Nm टॉर्क देते.

दुसरीकडे, ज्युपिटर 125 ची किंमत 82,100 ते 90,335 रुपये आहे. यात 124.8cc इंजिन असून iGO Assist टेक्नोलॉजीच्या मदतीने 6.3 kW पॉवर आणि 11.1 Nm टॉर्क मिळतो. या मॉडेलची स्पर्धा सुझुकी अॅक्सेस 125 आणि होंडा अॅक्टिव्हा 125 यांच्याशी होते.

डिझाइन आणि फीचर्समध्येही बदल

ऑगस्ट 2024 मध्ये ज्युपिटर 110 ची दुसरी जनरेशन सादर करण्यात आली. या अपडेटमध्ये डिझाइन आणि मेकॅनिकल्समध्ये बदल करण्यात आले. स्कूटरमध्ये 33 लिटरची अंडरसीट स्टोरेज कॅपसिटी असून त्यात 2 हेल्मेट ठेवता येतात. बाहेरील फ्युल फिलरमुळे सीट न उघडता पेट्रोल भरता येते. निवडक व्हेरिएंटमध्ये SmartXonnect स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीही मिळते.

ऑगस्ट 2026 मध्ये कंपनीने ज्युपिटर 110 ची Dual Tone Spectral एडिशन आणली. यात रंग बदलणारा पेंट फिनिश, सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स, USB Type-C चार्जिंग पोर्ट, क्रोम फिनिश मिरर आणि इंटिग्रेटेड बॅकरेस्ट देण्यात आले आहे. या यशामुळे ज्युपिटरची भारतीय स्कूटर मार्केटमधील लोकप्रियता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Manoj Jarange Patil : कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीये? मनोज जरांगे थेट तुमच्या जिल्ह्यात येणार! लवकरच महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा

Sachin Sawant : 'मुस्लिम गुन्हेगार टाइम बॉम्ब, इतर धर्माचे फुलबाजा का?' कुर्ला मारहाण प्रकरणावरून सचिन सावंतांचा भाजपला थेट सवाल!

IND A vs UAE : वैभव सूर्यवंशानं ODI चा चेहरा मोहराच बदलला, आधी 28 चेंडूंत शतक, तर 53 चेंडूंत ठोकलं खणखणीत द्विशतक

BJP SAD Alliance : पंजाबमधील गुंडगिरी आणि नशा संपवणार! भाजप-अकाली दलाच्या युतीवर नायब सैनींचं मोठं विधान

Uday Samant: एकनाथ शिंदेंच्या राजकीय हालचालींचा कुणालाच थांगपत्ता लागत नाही! उदय सामंतांचा खासदार ओमराजेंना टोला