पैसेही वाढणार अन् इन्कम टॅक्सही वाचणार! या स्कीम्स देतात डबल फायदा  Best Tax Saving Investment
Business

Best Tax Saving Investment : पैसेही वाढणार अन् इन्कम टॅक्सही वाचणार! या स्कीम्स देतात डबल फायदा

Best Tax Saving Investment : गुंतवणूक करताना केवळ चांगला परतावा मिळवणे पुरेसे नसते, तर कर बचतीचे योग्य नियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे असते. अशा अनेक सरकारी आणि बाजारपेठेशी निगडित योजना आहेत.

Ankita Karangutkar
  • पैसेही वाढणार अन् इन्कम टॅक्सही वाचणार!

  • या स्कीम्स देतात डबल फायदा

  • नेमक्या कोणत्या जाणून घ्या

Best Tax Saving Investment : देशात अनेक बचत योजना उपलब्ध आहेत. या योजना सार्वजनिक क्षेत्रातील बँका, पोस्ट ऑफिस, सरकारी आणि खाजगी बँकांद्वारे दिल्या जातात आणि त्या वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळे व्याजदर देतात. लोक त्यांच्या पात्रतेनुसार, पसंतीनुसार आणि फायद्यांनुसार त्यात गुंतवणूक करतात आणि कालांतराने लक्षणीय परतावा मिळवतात. पण अशा काही योजना आहेत ज्यामुळे पैसेही वाढतात आणि इन्कम टॅक्सही वाचणार. कोणत्या आहेत या योजना ज्यामुळे तुम्हाला डबल फायदा मिळू शकतो?

कर-बचत करणाऱ्या सरकारी योजना?

अशा अनेक सरकारी बचत योजना आहेत ज्या कर-बचत किंवा कर-सवलत देतात. यामध्ये सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सार्वजनिक भविष्य निधी, ५-वर्षीय एनएससी VIII योजना आणि मुदत ठेवी यांचा समावेश आहे.

या योजनांमध्ये गुंतवणूक अगदी ₹250 पासून सुरू करता येते. यापैकी अनेक योजनांमध्ये ₹500 आणि ₹1000 पासून गुंतवणुकीची सोय आहे. यामध्ये 6.9% ते 8.2% पर्यंत वार्षिक व्याजदर मिळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कर बचत आणि सवलतींच्या बाबतीत, या योजना आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत देतात. या सर्व पोस्ट ऑफिस बचत योजना आहेत.

शासकीय बचत योजना, प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे

आता आपण या प्रत्येक शासकीय बचत योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे एका तक्त्यामध्ये पाहू.

  1. सुकन्या समृद्धी योजना: या योजनेअंतर्गत ८.२ टक्के व्याजदर मिळतो. यात प्रति मुलगी किमान २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये (एक खाते) गुंतवणूक करता येते. या योजनेला कलम ८०सी अंतर्गत कर लाभ मिळतो.

  2. ज्येष्ठ नागरिक बचत योजना: या योजनेत ८.२ टक्के व्याजदर दिला जातो. यामध्ये किमान १,००० रुपये आणि कमाल ३० लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा असून, गुंतवणूकदाराचे किमान वय ६० वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच याला कलम ८०सी चा कर लाभ उपलब्ध आहे.

  3. सार्वजनिक भविष्य निधी (पीपीएफ): पीपीएफमध्ये ७.१ टक्के व्याजदर मिळतो. यामध्ये प्रति वर्ष किमान ५०० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये गुंतवणूक करता येते. याचा कालावधी १५ वर्षांचा असून, मिळणारा परतावा करमुक्त असतो आणि कलम ८०सी अंतर्गत कर सवलत मिळते.

  4. ५-वर्षीय एनएससी VIII आवृत्ती: या योजनेवर ७.७ टक्के व्याजदर मिळतो. गुंतवणुकीसाठी किमान रक्कम १,००० रुपये असून, कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. यामध्ये टीडीएस कापला जात नाही आणि कलम ८०सी चा कर लाभ मिळतो.

  5. मुदत ठेव: मुदत ठेवींवर ६.९ ते ७.५ टक्के दरम्यान व्याजदर मिळतो. यात किमान गुंतवणूक १,००० रुपये असून, कमाल रकमेची कोणतीही मर्यादा नाही. ही सुविधा १, २, ३ आणि ५ वर्षांसाठी उपलब्ध असून, ठराविक अटींनुसार कलम ८०सी चा कर लाभ मिळू शकतो.

येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की, या योजनांमध्ये कालांतराने व्याजदर, कर सवलती आणि इतर गोष्टींमध्ये बदल होण्याची शक्यता असते. पण तरीही बचत करण्यासाठी हे पर्याय महत्त्वाचे ठरतात.

( Desclaimer : या विश्लेषणातील शिफारसी वैयक्तिक विश्लेषक किंवा ब्रोकरेज कंपन्यांच्या आहेत, नवराष्ट्रच्या नाहीत. गुंतवणूकदारांनी कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांचा सल्ला घ्यावा, असा आम्ही सल्ला देतो. )

Political News : 'संदीप देशपांडेंच्या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करा...'; निलेश राणेंची मागणी

JEE Main 2027 चा फॉर्म भरताना चूक झाली? आता करता येणार दुरुस्ती!

Chandrapur News: धान कापणी संपताच शेतमजुरांवर बेरोजगारीचे संकट; मिरची तोडणीसाठी तेलंगणात धाव

Gymnastics National Championship : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राची ताकद; प्रसाद सालापची चार सुवर्णपदकांना गवसणी

Pocket Novel Movie: ‘पॉकेट नोवेल’मध्ये विजय सेतुपतीचा अनोखा अंदाज; नव्या लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा