बजेट

Tariff: 'भारताने राजनैतिक चर्चा करावी, मात्र...'; नव्या टॅरिफ युद्धावरून डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे भाष्य

Tariff: भारताच्या उत्पादन क्षमतेवर आणि मेक इन इंडिया धोरणावर प्रश्न उपस्थित करणे हे विरोधाभासी आहे. भारताने पर्यायी बाजारपेठा विकसित केल्यामुळे या निर्णयाचा परिणाम मर्यादित राहू शकतो.

तेजस भागवत
  • ट्रम्प यांचे नवे टॅरिफ युद्ध म्हणजे दबावतंत्राचा कांगावा

  • अमेरिकेच्या व्यापार धोरणातून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न

  • भारताने धमक्यांपुढे झुकू नये - डॉ. शैलेंद्र देवळाणकर

सोनाजी गाढवे/Tariff: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ युद्धाचे अस्त्र उगारले आहे. भारतासह १४ देशांवर १७ ते ४० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, या निर्णयामागे व्यापारातील असमतोलापेक्षा अमेरिकेला अधिकाधिक व्यापार सवलती मिळवून देण्याचे राजकीय आणि आर्थिक दबावतंत्र असल्याचे दिसते.

भारताच्या उत्पादन क्षमतेवर आणि मेक इन इंडिया धोरणावर प्रश्न उपस्थित करणे हे विरोधाभासी आहे. भारताने पर्यायी बाजारपेठा विकसित केल्यामुळे या निर्णयाचा परिणाम मर्यादित राहू शकतो. अमेरिकेच्या या नव्या टॅरिफ युद्धाचे स्वरूप, भारतावरील संभाव्य परिणाम आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील बदल याबाबत उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी ‘नवराष्ट्र’शी संवाद साधला.

ट्रम्प यांनी पुन्हा टॅरिफ युद्ध सुरू केले आहे. या निर्णयामागील नेमका उद्देश काय आहे?

अमेरिकेच्या १९७४ च्या व्यापार कायद्यातील कलम ३०१ अंतर्गत हे टॅरिफ घोषित करण्यात आले आहेत. अन्याय्य व्यापार पद्धतींच्या नावाखाली शुल्क लावण्याचे अधिकार अमेरिकेला आहेत. मात्र, प्रत्येक घोषणेसोबत व्यापार कराराची अट जोडली जात आहे. त्यामुळे हा निर्णय व्यापारापेक्षा इतर देशांकडून अधिक सवलती मिळवण्याचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

US 100% Tariff Impact : भारतावरचं संकट वाढलं? डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी... 100% टॅरिफचा दणका, होणार मोठा परिणाम?

भारतावर प्रस्तावित टॅरिफचा परिणाम किती गंभीर असेल?

भारतावर २५ टक्के टॅरिफ प्रस्तावित असून व्यापार करार झाल्यास तो १७ टक्क्यांपर्यंत आणण्याचे संकेत आहेत. मात्र, भारताने यामुळे घाबरण्याची गरज नाही. ऑटो पार्ट्स, वस्त्रोद्योग, रत्ने-दागिने, चामड्याच्या वस्तू आणि मत्स्य उत्पादनांसाठी भारताने पर्यायी बाजारपेठा विकसित केल्या आहेत. त्यामुळे निर्यातीवरील परिणाम काही प्रमाणात मर्यादित राहू शकतो.

भारताच्या उत्पादन क्षमतेवर आणि मेक इन इंडिया धोरणावर अमेरिकेने आक्षेप घेतला आहे. याकडे कसे पाहता?

भारताची उत्पादनक्षमता वाढत असल्याचा आक्षेप घेणे हास्यास्पद आहे. कारण अमेरिका स्वतःच्या उद्योगांना मोठ्या प्रमाणावर अनुदाने आणि आर्थिक मदत देते. सेमीकंडक्टर क्षेत्रातही अमेरिकेची गुंतवणूक आहे. चीन, अमेरिका आणि युरोपने उत्पादन वाढवायचे; मात्र भारताने वाढवू नये, ही भूमिका नव्या वसाहतवादी मानसिकतेचे उदाहरण आहे.

चीन, इंडोनेशिया आणि थायलंडलाही टॅरिफचा सामना करावा लागत आहे. भारताला त्याचा फायदा होऊ शकतो का?

या देशांवरही मोठ्या प्रमाणात आयात शुल्क प्रस्तावित असल्यामुळे भारताची स्पर्धात्मक स्थिती पूर्णपणे कमकुवत होणार नाही. युरोप, मध्य आशिया, पश्चिम आशिया आणि आग्नेय आशियातील बाजारपेठांशी भारताचे व्यापार संबंध वाढत आहेत. त्यामुळे अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्याची संधी भारताला मिळू शकते.

US Tariff on India: भारतावर 100% टॅरिफचं संकट, अमेरिकन काँग्रेसमध्ये विधेयक मंजूर; आता ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा

अमेरिकेच्या या निर्णयाला भविष्यात आव्हान मिळू शकते का? भारताने कोणती भूमिका घ्यावी?

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून या निर्णयाला आव्हान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेतही टॅरिफ धोरणाला विरोध आहे. वाढत्या महागाईचा परिणाम नागरिकांवर होत आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्यावर देशांतर्गत दबावही वाढू शकतो. भारताने राजनैतिक चर्चा करावी; मात्र कोणत्याही दबावाखाली आपल्या आर्थिक हितसंबंधांशी तडजोड करू नये.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह किती देशांवर टॅरिफ लावण्याचे संकेत दिले आहेत?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह एकूण १४ देशांवर १७ ते ४० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क अर्थात टॅरिफ लावण्याचे संकेत दिले आहेत.

अमेरिकेच्या नव्या टॅरिफ निर्णयाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो?

अमेरिकेच्या नव्या टॅरिफ निर्णयामुळे भारतीय निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, भारताने पर्यायी बाजारपेठा विकसित केल्यामुळे या निर्णयाचा परिणाम मर्यादित राहू शकतो.

भारतात सुरू होणार Apple चे सातवे अधिकृत रिटेल स्टोअर, कंपनीने केली या शहराची निवड

इन्स्टाग्रामवर मैत्री, गणपती दर्शनाच्या बहाण्याने तरुणीला बोलावले अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Alpana art: अल्पना आर्टचा वाढतोय ट्रेंड! जाणून घ्या बंगालच्या या पारंपरिक कलेचे महत्त्व आणि खास वैशिष्ट्ये

अमरावती विमानतळावरून रात्रीच्या विमानसेवेचा मार्ग अखेर मोकळा; आता केवळ अंतिम मंजुरीची प्रतीक्षा

Israel : इस्रायलमध्ये सत्तांतराची नांदी! आयझेनकोट आणि गोलान यांच्यात युती; अरब पक्ष 'रा'आम'ही सरकारमध्ये सामील होणार?