PF चे पैसे काढायला महिनेभर वाट पाहण्याची गरज नाही! थेट UPI ने खात्यात येणार रक्कम  ( सौजन्य - सोशल मीडिया )
Business

EPFO UPI PF Withdrawal : PF चे पैसे काढायला महिनाभर वाट पाहण्याची गरज नाही! थेट UPI ने खात्यात येणार रक्कम; फक्त 'हे' काम करा

EPFO UPI PF Withdrawal : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO ने कोट्यवधी सदस्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता पीएफचे पैसे काढण्यासाठी २० दिवस वाट पाहण्याची गरज राहणार नाही. आता तुम्ही थेट यूपीआयच्या माध्यमातून पीएफची रक्कम बँक खात्यात मिळवू शकता.

Ankita Karangutkar
  • PF चे पैसे काढायला महिनेभर वाट पाहण्याची गरज नाही!

  • थेट UPI ने खात्यात येणार रक्कम

  • फक्त 'हे' काम करा

EPFO UPI PF Withdrawal : नोकरदारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता तुम्हाला तुमचा भविष्य निर्वाह निधी म्हणजे PF काढण्यासाठी लांबलचक अर्ज भरावे लागणार नाहीत किंवा त्यासाठी तुम्हाला आठवडाभर वाट पाहावी लागणार नाही. आता तुमचं हे काम अगदी सहज आणि सोयीने होणार आहे. नेमकं ते कसं काय? सगळं सविस्तर समजून घेऊयात,

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO यांनी डिसेंबर अखेरपर्यंत युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI द्वारे पीएफ काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत, UPI द्वारे पैसे काढण्याची किमान मर्यादा ₹१,००० निश्चित केली जाऊ शकते.

१,००० रुपयांची मर्यादा का?

अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की, लोकांना वारंवार लहान रक्कम काढण्याची विनंती करण्यापासून रोखण्यासाठी १,००० रुपयांची किमान मर्यादा निश्चित केली जात आहे. यामुळे ईपीएफओच्या प्रणालीवरील अनावश्यक प्रक्रियेचा भार टळेल. तसंच आता या सुविधेसाठीचे तंत्रज्ञान पूर्णपणे तयार असून, वापरकर्ता चाचण्यांच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. चाचणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ईपीएफओच्या नवीन तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म 'सेंट्रलाइज्ड आयटी एनेबल्ड सिस्टीम २.०' मध्ये स्थलांतर करण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी शिल्लक आहेत, ज्या अंमलबजावणीपूर्वी सोडवल्या जात आहेत.

३ दिवसांपेक्षा कमी काळात सेटल होणार क्लेम

केंद्र सरकार 'प्रोजेक्ट ईपीएफओ ३.०' अंतर्गत एक मोठे डिजिटल परिवर्तन राबवत आहे. कोअर बँकिंग प्रणालीसारखी वैशिष्ट्ये प्रदान करणे आणि कागदपत्रांचे काम कमी करणे हा याचा उद्देश आहे. नवीन प्रणालीमध्ये आवश्यक तपासणी आणि पडताळणी पूर्ण करणारे दावे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलितपणे निकाली काढले जातील. सरकारच्या मते, यामुळे दावा निकाली काढण्याचा कालावधी २० दिवसांवरून ३ दिवसांपेक्षा कमी होईल.

मिनिमम बॅलेंस आणि वेटिंग पीरियडमध्येही दिलासा

अलीकडेच, कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) सदस्यांना त्यांच्या बचतीचा सहज वापर करता यावा यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.

मिनिमम बॅलेंस : पूर्वी, वयाच्या ५५ ​​वर्षांपर्यंत आवश्यक असलेल्या एकूण योगदानाच्या २५% किमान शिल्लक ठेवण्याची अट होती, परंतु आता ती १०% पर्यंत कमी करण्यात आली आहे.

वेटिंग पीरियड कमी: नोकरी सोडल्यानंतर अंतिम पीएफ काढण्यासाठीचा प्रतीक्षा कालावधी १२ महिन्यांवरून फक्त २ महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

एसडब्ल्यूपी सुविधा: सदस्य आता सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी) द्वारे त्यांच्या सेवानिवृत्ती निधीतून ठराविक कालावधीने पैसे काढू शकतील.

IND vs NZ: पहिला दिवस रोमांचक! 110/4 वरून 246/5 पर्यंत, भारतीय संघाला सहाव्या विकेटसाठी आस

New Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत नव्या चित्रपटाची एन्ट्री! ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’च्या पोस्टरने वेधले लक्ष

Mumbai Ahmedabad Highway : उद्घाटनापूर्वीच उड्डाणपुलाला भेगा! कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही दर्जावर प्रश्नचिन्ह; कारवाईची मागणी

ठाकुर्ली स्थानकावर खळबळ! सिगारेट-बिडी ओढण्यास मनाई केल्याने प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर चाकूने हल्ला.

Health tips: तुमच्या घरातही येतेय का अस्वच्छ पाणी? पाणी स्वच्छ करण्यासाठी करा हे ८ सोपे उपाय!