Farmer Loan Waiver : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सुखावणारी अशी बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकरी लाभार्थ्यांची तिसरी यादी 12 ऑक्टोबरला 2026 रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या बातमीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ( Farmer Loan Waiver )
जाहीर केलेल्या या तिसऱ्या यादीत राज्यातील 3 लाख 51 हजार 192 शेतकऱ्यांचा म्हणजे Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांनो, कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर! 'इतक्या' शेतकऱ्यांचा समावेश; तुमचंही नाव असेल तर लगेच करा 'हे' काम साडेतीन लाख शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची थकबाकी तपासून तातडीने जवळच्या एखाद्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण म्हणजे Aadhaar Authentication पूर्ण करुन घ्या आणि कर्जमुक्तीचा लाभ घ्या असं आवाहन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलंय.
राष्ट्रियीकृत आणि व्यापारी बँकांमधील काही पात्र शेतकऱ्यांच्या कर्जाची थकबाकी 31 मार्च 2026 रोजी दोन लाखांपेक्षा अधिक असल्याचं नमूद आहे. पण शासनाच्या हेअर कट धोरणाच्या अनुषंगाने संबंधित कर्ज पूर्णपण निरंक करण्यात येणार असल्याची माहिती दिली गेली आहे. त्यामुळे थकबाकी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असलं तर आपल्याला लाभ मिळणार नाही असा थेट निष्कर्ष शेतकऱ्यांनी काढू नकात. यादीतील नोंद आणि बँकेकडील तपशील नीट तपासून घ्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजने अंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेली, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली अशी पीकर्जे तसेच पुरर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर विभाग - २ लाख ६ हजार ४५०
अमरावती विभाग - ८५ हजार ७६
नागपूर विभाग - ३० हजार ७३८
नाशिक विभाग - १४ हजार २४४
पुणे विभाग - ११ हजार ९२८
कोकण विभाग - २ हजार ७५६
राज्यातील विविध विभागातील इतक्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
तिसऱ्या यादीमधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची जिल्हा निहाय यादी बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. कर्ज थकबाकीची खातरजमा करून आधार प्रमाणीकरण करण्यास सांगितलं आहे. या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्ज थकबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार नमूद करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२६ पासूनचे पुढील व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करून जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.