New Contra Fund Launch  New Contra Fund Launch
Business

New Contra Fund Launch : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अवघ्या 99 रुपयांपासून सुरू करता येणार गुंतवणूक; कसा मिळणार फायदा?

New Contra Fund Launch :

Ankita Karangutkar
  • गुंतवणूकदारांना मोठी संधी!

  • अवघ्या 99 रुपयांपासून सुरू करता येणार गुंतवणूक

  • कसा मिळणार फायदा?

New Contra Fund Launch : तुम्हीही गुंतवणूक करत असाल आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. मिराई असेट म्युच्युअल फंड एक नवीन फंड सुरु करत आहे. ज्यामुळे एक ओपन-एंडेड इक्विटी योजना आहे. यातून कॉन्ट्रॅरियन स्ट्रॅटेजीचा वापर करते. याचा अर्थ असा की, हा फंड अशा व्यवसायांमध्ये गुंतवणूक करेल जे सध्या बाजारपेठेच्या आवाक्याबाहेर आहेत किंवा ज्यांच्याकडे गुंतवणूकदारांची पुरेशी पोहोच नाही. चला, या फंडात गुंतवणूक कशी करायची समजून घेऊयात.

NFO कधी सुरू होणार?

Mirae Asset Contra Fund चा एनएफओ २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल आणि ११ डिसेंबर २०२६ रोजी बंद होईल. यानंतर, २१ डिसेंबरपासून या योजनेत सतत खरेदी आणि रिडेम्प्शन पुन्हा सुरू होईल. याचा अर्थ असा की, २१ डिसेंबरनंतर गुंतवणूकदार या फंडाचे युनिट्स कधीही खरेदी किंवा विकू शकतील.

किती करु शकता गुंतवणूक?

तुम्हाला या फंडामध्ये एकरकमी गुंतवणूक करायची असल्यास, तुम्ही NFO दरम्यान आणि योजना पुन्हा सुरू झाल्यानंतर किमान ₹5,000 ची गुंतवणूक करू शकता. तुम्हाला या फंडात SIP म्हणून गुंतवणूक करायची असल्यास, किमान रक्कम ₹99 आहे. हे लक्षात घ्यावे की, या फंडाच्या कामगिरीची तुलना निफ्टी 500 टोटल रिटर्न इंडेक्स (TRI) शी केली जाईल, जो त्याचा बेंचमार्क आहे. फंड हाऊस किमान तीन वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करते.

शेअर्सची निवड कशी केली जाईल?

फंड हाऊसच्या मते, हा फंड कोणत्याही स्टॉकवर आंधळेपणाने विश्वास ठेवणार नाही. गुंतवणुकीचे निर्णय फंड हाऊसच्या अंतर्गत गुंतवणूक चौकटीनुसार घेतले जातील, जी प्रत्येक संधीचे पाच मापदंडांवर मूल्यांकन करते:

बाजारातील भावना: स्टॉकची घसरण नकारात्मक भावनेमुळे आहे की तात्पुरत्या घटकांमुळे?

घसरणीचे कारण: ही घसरण तात्पुरती आहे, की कंपनीच्या व्यवसाय मॉडेलमध्ये काही गंभीर समस्या आहे?

व्यवसायाची मूलतत्त्वे: कंपनीची कमाई, ताळेबंद आणि कामकाजाची मूलतत्त्वे अजूनही मजबूत आहेत का?

पुनर्प्राप्तीचे घटक: भविष्यात व्यवसायात सुधारणा आणि गती आणू शकणारे संभाव्य घटक कोणते आहेत?

टप्प्यानुसार गुंतवणूक: सर्व पैसे एकाच वेळी गुंतवण्याऐवजी, गुंतवणूक टप्प्याटप्प्याने केली जाईल.

Desclaimer : येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी कृपया आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

Winter: आला थंडीचा महिना पण हवेतून गारवा गायब; डिसेंबरमध्ये हुडहुडी की उकाडा? वाचा सविस्तर

WhatsApp वर आवाजासह Animated Stickers! स्वतःचे मजेदार स्टिकर्स कसे तयार कराल?

26/11 Mumbai Terror Attack : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अमेरिकेची श्रद्धांजली; दहशतवादाविरोधात भारतासोबत ठामपणे उभे राहू, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची ग्वाही

Chandrapur News: ११ वर्षांनंतरही चंद्रपूर मेडिकल कॉलेज नव्या इमारतीत नाहीच; प्रतीक्षा संपणार कधी?

Silver Chain Astrology: गळ्यात चांदीची साखळी घालण्याचे काय आहेत फायदे, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व