Pahalgam Terror Attack: पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजचे पोर्टल बंद, कारण काय? जाणून घ्या (फोटो सौजन्य - सोशल मीडिया) 
Business

Pahalgam Terror Attack: पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजचे पोर्टल बंद, कारण काय? जाणून घ्या

Share Market: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे, दोन दिवसांत २,५०० पेक्षा जास्त अंकांची घसरण नोंदली गेली आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या

हर्षदा डोंगरे

Share Market Marathi News: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. दोन दिवसांत तेथील शेअर बाजार २५०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे. काल, गुरुवार २४ एप्रिल रोजी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज (PSX) मध्ये मोठी घसरण दिसून आली. पीएसएक्समध्ये तीन दिवसांत जवळपास ४००० अंकांची घसरण झाली आहे. बुधवारी पाकिस्तानचा शेअर बाजार १२०० अंकांनी आणि गुरुवारी २५०० अंकांनी घसरला.

यानंतर, आज शुक्रवारी पाकिस्तानच्या शेअर बाजारात ४०० अंकांपर्यंत घसरण दिसून आली. पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंजवर ट्रेडिंग सुरू आहे, परंतु हे पोर्टल भारतासाठी बंद करण्यात आले आहे दरम्यान, आज २५ एप्रिल रोजी पाकिस्तानी शेअर बाजाराची वेबसाइट क्रॅश झाली आहे. जेव्हा आम्ही त्यांची वेबसाइट उघडली तेव्हा एक संदेश दिसला ज्यामध्ये लिहिले होते, "We’ll be back soon."(आम्ही लवकरच परत येऊ).

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे. ज्याचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावर दिसून येत आहे. आर्थिक संकटातून जात असताना पाकिस्तानचा शेअर बाजार वाईट स्थितीत आहे. काल, केएसई १०० (कराची स्टॉक एक्सचेंज) उघडल्यानंतर पहिल्या पाच मिनिटांत २.१२% किंवा २,४८५.८५ अंकांनी घसरून ११४,७४०.२९ वर पोहोचला.

पाकिस्तानचा शेअर बाजार का कोसळला?

भारताकडून वाढत्या तणावामुळे आणि आयएमएफने आर्थिक वर्ष २०२५ च्या जीडीपी वाढीचा अंदाज ३% वरून २.६% पर्यंत कमी केल्यामुळे ही घसरण दिसून येत आहे.

आयएमएफने पाकिस्तानचा विकास दर २.६% पर्यंत कमी करणे, कमकुवत रुपया, राजकीय अनिश्चितता आणि काश्मीरमधील तणाव यामुळे धोका आणखी वाढला आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांना आपला जीव गमवावा लागला, त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

पाकिस्तानचा जीडीपी मंदावणार

तुम्हाला सांगतो की अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने आर्थिक जोखीम आणि सतत बाह्य असुरक्षिततेचा हवाला देत आर्थिक वर्ष २५ साठी पाकिस्तानच्या GDP वाढीचा अंदाज २.६ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. आशियाई विकास बँकेने (ADB) पाकिस्तानचा २०२५ चा GDP वाढीचा अंदाज डिसेंबर २०२४ मध्ये ३ टक्क्यांवरून २.५ टक्के केला आहे. दोन्ही अंदाज पाकिस्तान सरकारने या आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेल्या ३.६ टक्के वाढीच्या लक्ष्यापेक्षा कमी आहेत.

बाजार सतत घसरत आहे

गुरुवारी व्यवहाराच्या पहिल्या पाच मिनिटांत कराची-१०० निर्देशांक (केएसई-१००) दोन टक्क्यांनी किंवा २,५०० अंकांपेक्षा जास्त घसरून १,१४,७४०.२९ वर पोहोचला. दुपारी ३ वाजेपर्यंत निर्देशांकाने काही तोटा भरून काढला असला तरी, तो १,५३२.४२ अंकांनी किंवा १.३१ टक्क्यांनी घसरून ११५,६९३.७२ वर व्यवहार करत होता. शुक्रवारी व्यवहारादरम्यान कराची १०० ४०० अंकांनी घसरून ११४,७९६.३१ वर पोहोचला.

Winter Health Tips: हिवाळ्यात तहान कमी लागते म्हणून पाणी कमी पिताय? डिहायड्रेशन टाळण्यासाठी आहारात समावेश करा 'या' गोष्टी

Meera Joshi Vishwanath Kulkarni Chemistry : ‘रुणु झुणु’मधून विश्वनाथ कुलकर्णीचा रोमँटिक अंदाज; मीरा जोशीसोबतची केमिस्ट्री चर्चेत

पुणे शहर विद्रूपीकरण पुरस्कारात सत्ताधारी पक्षाचे नेते अव्वल! स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना ‘साहेब’ किताब

World News : सौदी अरेबियाच्या रास तनुरा तेल रिफायनरीवर हौथींचा हल्ला; आगीचा दावा, चार ड्रोन पाडल्याची माहिती

Big Breaking: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार! एकाच टीममध्ये पुरुष-महिला खेळणार; Zaheer khan च्या 'Equal' ची घोषणा