Emergency Fund ठेवायचा कुठे? ( सौजन्य - सोशल मीडिया )  
Business

Emergency Fund ठेवायचा कुठे? FD, Savings की Liquid Fund; कोणता पर्याय ठरेल योग्य?

Emergency Fund Investment Tips : ५ लाख रुपयांसारखा मोठा इमर्जन्सी फंड तयार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र, हा निधी बँक बचत खात्यात, एफडीमध्ये की म्युच्युअल फंडांच्या लिक्विड फंडामध्ये ठेवावा, असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडतो.

Ankita Karangutkar
  • Emergency Fund ठेवायचा कुठे?
  • FD, Savings की Liquid Fund
  • कोणता पर्याय ठरेल योग्य?

Emergency Fund Investment Tips : कधी कोणती घटना समोर येऊन उभी राहिल सांगता येत नाही. अचानक नोकरी जाणं, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असोत किंवा मोठा घरगुती खर्च असोत यांसारखे प्रसंग अचानक उद्भवतात. पण यातून कोणत्याही त्रासाशिवाय बाहेर पडण्यासाठी पैशांची गरज असते. म्हणूनच अशा वेळी आपत्कालीन निधी तयार ठेवणं आवश्यक मानलं जातं. पण जर तुमच्याकडे 5 लाख रुपयांची बचत असेल तर ती नेमकी कुठे ठेवायची? कोणता पर्याय ठरेल योग्य? समजून घेऊयात. ( Emergency Fund Investment Tips ) 

तुमच्या आपत्कालीन निधीचा काही भाग बचत खात्यात ठेवणे उपयुक्त ठरू शकते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गरज पडल्यास पैसे सहज काढता येतात. जर तुम्हाला अनपेक्षित हॉस्पिटलचे बिल भरायचे असेल किंवा एखादे महत्त्वाचे पेमेंट करायचे असेल, तर तुम्हाला तुमची गुंतवणूक काढण्यासाठी वाट पाहावी लागत नाही. पण नियमित बचत खात्यांवरील व्याजदर तुलनेने कमी असू शकतात. त्यामुळे, संपूर्ण रक्कम या खात्यात ठेवल्याने चांगला रिटर्न मिळणार नाही.

FD वर निश्चित व्याजचा रिटर्न

ज्यांना आपल्या पैशांवर पूर्वनिश्चित व्याजदर मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी बँकेच्या FD उपयुक्त ठरू शकतात. व्याजदर बँक आणि ठेवीच्या मुदतीनुसार बदलतो. तथापि, एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी मुदतपूर्व पैसे काढण्याच्या अटी तपासणे महत्त्वाचे आहे. मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढल्यास दंड किंवा कमी व्याज लागू शकते. त्यामुळे, सर्व आपत्कालीन बचत दीर्घकालीन एफडीमध्ये ठेवणे सोयीचे नाही.

लिक्विड म्युच्युअल फंड

लिक्विड म्युच्युअल फंड प्रामुख्याने अल्प-मुदतीच्या डेट आणि मनी मार्केट साधनांमध्ये गुंतवणूक करतात. पैसे काढण्याची प्रक्रिया तुलनेने जलद असते, परंतु निधी बँक खात्यात जमा होण्यास वेळ लागू शकतो. त्यांचा परतावा बाजाराशी निगडित असतो आणि त्याची हमी नसते. त्यामुळे, त्यांना पूर्णपणे जोखीममुक्त पर्याय मानू नये.

₹५ लाख कसे डिव्हाईड करु?

उदाहरणार्थ, बँकबाजारचे सीईओ अधिल शेट्टी यांच्या मते, ₹५ लाखांचा आपत्कालीन निधी तीन भागांमध्ये विभागला जाऊ शकतो:

  • १ लाख – तात्काळ गरजा भागवण्यासाठी बचत खात्यात.
  • २ लाख – ठराविक अटींवर व्याज मिळवण्यासाठी एफडीमध्ये.
  • २ लाख – गरजेनुसार पैसे काढण्याच्या पर्यायासह लिक्विड म्युच्युअल फंडात.

हे फक्त एक उदाहरण आहे; ही विभागणी प्रत्येक व्यक्तीसाठी सारखीच असेलच असे नाही. योग्य प्रमाण तुमच्या मासिक गरजा, नोकरीची स्थिरता आणि जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेवर अवलंबून असेल.

जास्तीत जास्त परतावा नव्हे, तर सुरक्षितता महत्त्वाची

आपत्कालीन निधीचा उद्देश नफा वाढवणे हा नसून, कठीण काळात आर्थिक आधार देणे हा आहे. त्यामुळे, गुंतवणुकीचा पर्याय निवडताना, निधीची उपलब्धता, मुद्दलाची सुरक्षितता आणि पैसे काढण्याच्या अटी यांना प्राधान्य द्या. तुमच्या गरजेनुसार बचत खाती, एफडी आणि लिक्विड फंड यांचा संतुलित पद्धतीने वापर केला जाऊ शकतो.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!