रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ ( सौजन्य - सोशल मीडिया )  
Business

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?

Russia New Policy : रशियाने इंधन निर्यातीबाबत घेतलेल्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयामुळे जागतिक खनिज तेल आणि डिझेलच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर डिझेलच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Ankita Karangutkar
  • रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ
  • भारतावर काय होणार परिणाम?
  • डिझेलचे दर घसरणार?

Russia New Policy : जागतिक स्तरावर सुरु असलेली उलथापालथ आणि त्या घडामोडींचा भारतासह जगाभर होणारा परिणाम यावर सगळेच सध्या बारकाईने लक्ष्य ठेवून आहेत. या सगळ्यात कच्च्या तेलाच्या आणि पेट्रोल- डिझेलच्या किंमतींवरही लक्ष्य ठेवून असल्यास एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रशियाने घेतलेला एक निर्णय फार महत्त्त्वपू्र्ण आहे. रशियाने डिझेल निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात डिझेलचा पुरवठा करणं अधिक सोपं होणार आहे. मग आता पेट्रोल - डिझेलचे दर कमी होणार का? ( Russia New Policy ) 

वृत्तांनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश परदेशी बाजारपेठांमध्ये इंधनाची उपलब्धता वाढवणे आणि त्याचबरोबर रशियामधील देशांतर्गत गरजा पूर्ण करणे हा आहे. पण यामुळे डिझेलच्या किमती कितपत कमी होतील, हे मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असेल.

रशियाने डिझेल निर्यातीवरची पाबंदी का उठवली?

रशियाचे म्हणणे आहे की डिझेल उत्पादनामुळे देशांतर्गत गरजा पूर्ण होण्यास तसेच इतर देशांना पुरवठा करण्यास मदत होईल. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांच्या मते, डिझेल निर्यात आणि पुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी सरकार तेल कंपन्यांसोबत काम करणार आहे. खरं तर, युक्रेनने रशियन ऊर्जा प्रकल्पांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे काही रशियन तेल शुद्धीकरण प्रकल्पांचे कामकाज विस्कळीत झाले होते. यामुळे देशात डिझेलच्या उपलब्धतेबद्दल चिंता वाढली होती. याच कारणामुळे रशियाने यापूर्वी डिझेल निर्यातीवर निर्बंध लादले होते, जे आता उठवण्यात आले आहेत.

ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील डील काय?

वृत्तानुसार, रशिया आणि अमेरिका डिझेलचा पुरवठा वाढवण्यासाठी एका करारावर पोहोचले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात डिझेलची अतिरिक्त खेप पाठवण्याच्या योजनांचा समावेश आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अंदाजे ५,००,००० मेट्रिक टन डिझेलचा पुरवठा होणार आहे. वृत्तांनुसार ऑक्टोबरमध्ये ३,००,००० टन, नोव्हेंबरमध्ये ५,००,००० टन आणि त्यानंतर १,००,००० टन पुरवठा होणार असल्याचेही सूचित होते. तथापि, या आकड्यांची आणि पुरवठ्याच्या तारखांची स्वतंत्र पडताळणी करणे आवश्यक आहे.

डिझेलच्या किमती कमी होतील?

रशिया हा जगातील सर्वात मोठ्या डिझेल निर्यातदारांपैकी एक आहे. त्यामुळे, जर रशियाने इतर देशांना अधिक डिझेल पाठवले, तर आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची उपलब्धता वाढू शकते. डिझेलची गरज असलेल्या देशांना अतिरिक्त पुरवठा मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे किमतींवरील दबाव कमी होऊ शकतो, परंतु याची खात्री नाही.

US Tariff : अमेरिकेचा भारताला मोठा झटका! भारतीय वस्तूंवर 25% आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव; पण ट्रम्प यांनी 'या' अटीवर दिलासा देण्याची दर्शवली तयारी

Amruta Khanvilkar Launches Amulya: अभिनयासोबत आता व्यवसायातही बाजी! अमृता खानविलकरची 'अमुल्य' साडी बॉलिवूडपर्यंत पोहोचली

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या