फोटो सौजन्य- सोशल मीडिया  
Career

Federal Bank Recruitment 2026: फेडरल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! 'या' पदासाठी १० लाखांपर्यंत पॅकेज; आजच करा अर्ज!

Federal Bank Recruitment 2026: फेडरल बँकेने 'सेल्स ऑफिसर' पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.

श्रेया देशमुख

Federal Bank Recruitment 2026: बँकेत नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. फेडरल बँकेने 'फुल टाईम सेल्स ऑफिसर या पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत संपूर्ण भारतात विविध रिक्त पदे भरली जाणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२६ आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी अगदी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

महत्त्वाचे तपशील आणि पात्रता:

पदाचे नाव: सेल्स ऑफिसर – कॉर्पोरेट सॅलरी

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन (पदवी) पूर्ण केलेले असावे. तसेच, बीएफएसआय (BFSI) क्षेत्रात किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

कॉमर्सचा विद्यार्थी कसा बनला 'AI Kid of India'? जाणून घ्या केरळच्या तरुणाची यशोगाथा..वयोमर्यादा: उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षांपर्यंत असावे (उमेदवाराचा जन्म १ ऑगस्ट १९९१ किंवा त्यानंतरचा असावा).

वेतनमान (Salary Details): निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वार्षिक पॅकेज मिळणारा असून, हे पॅकेज ४.६४ लाख रुपयांपासून १०.९३ लाख रुपयांपर्यंत असणार आहे.

नोकरीचे ठिकाण: भारतात कुठेही.

निवड प्रक्रिया :

या पदांसाठी उमेदवारांची निवड प्रामुख्याने 'अप्लिकेशन स्क्रीनिंग' (अर्ज छाननी) आणि 'पर्सनल इंटरव्ह्यू'  या दोन टप्प्यांनुसार केली जाईल.

अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी फेडरल बँकेच्या [https://www.federalbank.co.in/] (https://www.federalbank.co.in/) या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी आपले ऑनलाइन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!