फोटो सौजन्य - एआय 
Career

MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! गट 'क' परीक्षेचा अर्ज भरण्यास 'या' तारखेपर्यंत मुदत

MPSC Group C Exam 2026: MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी आज २९ नोव्हेंबर रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करता येईल. शुल्क भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

श्रेया देशमुख
  • एमपीएससी गट-क परिक्षेच्या अर्जासाठी मुदत वाढ

  • अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस तर शुल्क उद्यापर्यंत

  • विहित मुदतीत अर्ज व शुल्क भरण्याचे आवाहन

MPSC Group C Exam 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६ साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. उमेदवारांना आज दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत उद्या दि. ३० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे.

'या' तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार

आयोगाने दि. २५ जून २०२६ रोजी या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर अतिरिक्त मागणी पत्रांमुळे दि. ०६ नोव्हेंबर २०२६ रोजी शुद्धिपत्रक काढून अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. २७ नोव्हेंबर २०२६ निश्चित केली होती. ज्यामध्ये आता २९ नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त अभिप्रायानुसार समतुल्य शैक्षणिक अर्हतेच्या संदर्भात दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

विहित मुदतीत अर्ज व शुल्क भरण्याचे आवाहन

त्यामुळे या परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास पात्र उमेदवार वंचित राहू नये, याकरिता आयोगाने अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. उमेदवारांनी शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळून विहित मुदतीत अर्ज व शुल्क भरण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

चुलत दीर आणि भावजयी बेपत्ता झाले अन् दुसऱ्याच सकाळी शेतातील स्टोअर रूममध्ये...

बिजवाई सोयाबीनला ८ हजारावर भाव! चार वर्षांनंतर सोयाबीनला सोन्याची झळाळी; शेतकऱ्यांना दिलासा

Iran : इराणची युद्धनीती जगात भारी! अमेरिकेला मात देण्यासाठी वापरले इलॉन मस्कचेच तंत्रज्ञान; स्टारलिंकचा वापर करून उडवले US Air Base

म्युझिक लव्हर्सना गिफ्ट द्यायचंय? हेडफोनपासून स्पीकरपर्यंत... 'हे' गॅझेट्स ठरतील बेस्ट पर्याय

डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी; 'या' बड्या नेत्याने दिला राजीनामा