फोटो सौजन्य- सोशल मीडिया 
Career

PM YASASVI: वाढत्या शैक्षणिक खर्चाचे टेन्शन मिटणार? केंद्र सरकारच्या 'पीएम यशस्वी योजने'चा लाभ थेट विद्यार्थ्यांना मिळणार!

PM YASASVI Scholarship: शिक्षणाचा वाढता खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे तुमच्या पाल्याच्या उच्च शिक्षणात अडथळे येत आहेत का? इयत्ता ९ वी ते १२ वी आणि कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ७५ हजारांपासून ते १.२5 लाखांपर्यंतची मदत देणारी केंद्र सरकारची 'पीएम यशस्वी योजना' नेमकी काय आहे? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

श्रेया देशमुख

PM YASASVI Scholarship 2026: आजच्या काळात शिक्षणाचा खर्च सातत्याने वाढत चालला आहे. अनेक विद्यार्थी अभ्यासात हूशार असूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे त्यांना आपले शिक्षण पूर्ण करणे कठीण होत आहे. अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने ‘पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना’(PM YASASVI) राबवण्यास सुरुवात केली आहे.

ही योजना अशा गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे, जे गरीब कुटुंबातून येतात. या योजनेचे संचलन सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांद्वारे(Ministry of Social Justice and Empowerment) केले जाते. विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्याद्वारे त्याच्या शिक्षणात मदत मिळवून देण्याचा उद्देश या शिष्यवृतीचा आहे.

'पीएम यशस्वी' योजनेअंतर्गत मिळणार मोठी आर्थिक मदत

ही शिष्यवृत्ती योजना प्रामुख्याने इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागासलेले वर्ग (EBC) आणि विमुक्त, भटक्या व अर्ध-भटक्या जमाती (DNT) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअतंर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, पुस्तके, स्टेशनरी आणि शिक्षणाशी संबंधित इतर आवश्यक खर्चासाठी आर्थिक मदत दिली जाते.

इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांना: दरवर्षी जास्तीत जास्त ७५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.

इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना: दरवर्षी जास्तीत जास्त १.२५ लाख रुपयांपर्यंत मदत मिळू शकते.

या अर्थिक मदतीमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबावरील शैक्षणिक खर्चाचा बोझा कमी होऊ शकतो.

अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी व निकष ठरवून देण्यात आले आहेत.

  • उमेद्वार हा ओबीसी (OBC), ईबीसी (EBC) किंवा डीएनटी (DNT) प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.
  • विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त सरकारी किंवा खाजगी शाळेत नियमित शिक्षण घेत असावा.

विशेष म्हणचे, ही योजना केवळ शालेय विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नसून कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही यात मदतीची तरतुद उपलब्ध आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आली असून इच्छुक विद्यार्थी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (National Scholarship Portal - NSP) द्वारे आपला अर्ज सादर करू शकतात.

Winter fashion: हिवाळ्यात कपडे खरेदी करताना निवडा हे ७ खास फॅब्रिक्स; लोकरीपासून फ्लिसपर्यंत जाणून घ्या कापडांचे प्रकार!

LinkedIn Study Entrepreneurship : स्टार्टअप आणि बिझनेसचा क्रेझ! 85% व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचाय; लिंक्डइनचा सर्वे काय सांगतो?

भातकापणीत मग्न सासू-सुनेवर काळाचा घाला; त्याच्या हल्ल्यात सासूचा मृत्यू, सून जखमी...

वृषणांची स्वतः तपासणी: पुरुषांना कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत करणारी एक सोपी सवय

US Tariff : अमेरिकेचा भारताला मोठा झटका! भारतीय वस्तूंवर 25% आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव; पण ट्रम्प यांनी 'या' अटीवर दिलासा देण्याची दर्शवली तयारी