बेलापूर न्यायालयात खळबळ! जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी; उपचारादरम्यान मृत्यू  बेलापूर न्यायालयात खळबळ! जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी; उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

Navi Mumbai News: बेलापूर न्यायालयात खळबळ! जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी; उपचारादरम्यान मृत्यू

Navi Mumbai News: नवी मुंबईतील बेलापूर न्यायालयात धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्याने न्यायालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे.

श्वेता झगडे
  • बेलापूर न्यायालयात खळबळ

  • जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी

  • उपचारादरम्यान मृत्यू

सावन वैश्य, नवी मुंबई : हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मानसिक तणावाखाली आलेल्या एका कैद्याने बेलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. नागेश बाबू लाड (वय ३४) असे मृत आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे न्यायालयीन परिसरात मोठा गोंधळ उडाला होता.(Navi Mumbai News)

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत आरोपी नागेश बाबू लाड याच्याविरोधात सन २०१९ मध्ये नेरूळ पोलीस ठाण्यात हत्या (कलम ३०२) आणि हत्येचा प्रयत्न (कलम ३०७) या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो न्यायालयीन कोठडीत (जेल कैदी) होता. आज बेलापूर न्यायालयात या खटल्याची अंतिम सुनावणी पार पडली. माननीय न्यायालयाने सर्व पुराव्यांची पडताळणी करून नागेश लाड याला दोषी ठरवत 'आजीवन कारावासाची' (जन्मठेप) शिक्षा सुनावली. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्याला न्यायालयाच्या कक्षातून बाहेर आणले जात असताना, शिक्षेच्या धक्क्याने त्याने अचानक पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारली.

उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

पाचव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने नागेश गंभीर जखमी झाला होता. न्यायालयाच्या आवारात एकच धावपळ आणि गोंधळ उडाला. उपस्थित पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

न्यायालयात सुरक्षा जाळी बसवण्याची मागणी

बेलापूर न्यायालयाच्या इमारतीत घडलेली ही अशा प्रकारची पहिलीच घटना आहे. या घटनेनंतर न्यायालयीन आवारातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीमध्ये ज्याप्रमाणे सुरक्षा जाळी (सेफ्टी नेट) बसवण्यात आली आहे, त्याच धर्तीवर बेलापूर न्यायालयाच्या प्रत्येक मजल्यावर सुरक्षा जाळी बसवण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. भविष्यात कोणत्याही आरोपीने किंवा फिर्यादीने मानसिक तणावाखाली येऊन असे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

न्यायालय परिसरात चर्चेला उधाण

न्यायालयात शिक्षा सुनावल्यानंतर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयाच्या इमारतीतील सुरक्षाव्यवस्था आणि आरोपीने घेतलेल्या या टोकाच्या पावलाबाबतही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपीचे नाव, त्याच्यावरील नेमका गुन्हा, न्यायालयाने दिलेल्या निकालाचा तपशील आणि पोलिसांची अधिकृत भूमिका याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका