File Photo : firing 
क्राईम

गर्लफ्रेंडने केला गर्भपात; संतापलेल्या प्रियकरानं तिच्या डोक्यात गोळी झाडली, जागेवरच मृत्यू

गॅब्रिएला गोन्झालेझ नुकतीच कोलोरॅडोहून परतली होती. तिथे तिनं गर्भपात केला. ही बाब तिच्या 22 वर्षीय प्रियकराला कळली तेव्हा त्याला धक्काच बसला.

Pravina Shirpurkar

अमेरिकेत (America) गर्भपाताविषयी कडक नियम आहेत. तेथे अनेक राज्यात मुलींना गर्भपात (Abortion) करण्याची परवानगी नाही. हे नियम टेक्सास राज्यातही लागू आहेत.  टेक्सासने सप्टेंबर २०२१ पर्यंत गर्भधारणेच्या सहा आठवड्यांनंतर गर्भपातावर बंदी घातली. तथापि, नंतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत सूट देण्यात आली आहे. मात्र, आता या नियमांमुळे 26 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. या मुलीने दुसऱ्या राज्यात  जाऊन गर्भपात केल्याानंतर संतापलेल्या प्रियकराने तिची गोळ्या झाडून हत्या केली. गॅब्रिएला गोन्झालेझ असं मृत मुलीच नाव आहे.  या प्रकरणी 22 वर्षीय हॅरोल्ड थॉमसनला अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, गॅब्रिएलाने गर्भपात करण्यावरुन तिच्या आणि प्रियकर हॅरोल्डमध्ये आधी वाद झाला. या वेळी संतापच्या भरात प्रियकराने तिला कारमधून ढकलून दिले आणि बंदूक बाहेर काढली. यावेळी तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या डोक्यात गोळी घातली. त्याने गोन्झालेझवर अनेक वेळा गोळ्या झाडल्या. त्यानंतर तित्या डोक्यात गोळी झाडली.

आरोपी अटकेत

हे प्रकरण उजेडात आल्यानंतर आरोपी प्रियकर थॉमसनला बुधवारी पोलिसांनी अटक केली. त्याची रवानगी सध्या डॅलस तुरुंगात करण्यात आली आहे. घटनास्थळी मुलीची बहीण हजर होती, असे सांगण्यात येत आहे. तिने गोळीबाराचा आवाज ऐकला. तर, दुसर्‍या एका व्यक्तीने सांगितले की गोन्झालेझकडे फोन नव्हता, जेणेकरून ती पोलिसांना कॉल करू शकेल. थॉमसनवर यापूर्वीही गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर कुटुंबातील सदस्यावर हल्ला आणि गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.

ASCI Report 2026 : सोशल मीडियाच्या जाहिरातीवरून वस्तू खरेदी करताय? थांबा! फसवणुकीचे प्रमाण 98 % वर; ASCI चा धक्कादायक रिपोर्ट

Sambhajinagar Sanskrit Camp : संस्कृत भाषेतून करिअरच्या संधी; संभाजीनगरमध्ये ८० विद्यार्थ्यांनी घेतले संस्कृतचे धडे

Raigad News: म्हसळ्यातील ६ गावांना पाणीटंचाईचा धोका? मेंदडी धरणाच्या दुरुस्तीसाठी हालचाली सुरु, गाळ उपशाचे निर्देश

शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता उद्योजकतेच्या संधींचे क्षेत्र म्हणून पाहा : सुनेत्रा पवार

Dry skin: थंडीत कोरड्या त्वचेवर महागड्या क्रीम लावण्याऐवजी करा 'हे' घरगुती उपाय, त्वचा होईल मुलायम