सौजन्य फोटो - AI Gemini  
क्राईम

Farmer Harassment : "भिकारड्या, लायकी नव्हती तर कर्ज का घेतलं?" फायनान्स कर्मचाऱ्याची शेतकऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिपमुळे खळबळ!

Farmer Harassment : दुष्काळाच्या झळा अन् वरून फायनान्स कंपनीचा भयंकर टॉर्चर! "भिकारड्या, लायकी नसेल तर कर्ज कशाला घेतलं?" बुलढाण्यात एयु फायनान्स कर्मचाऱ्याची शेतकऱ्याला शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल होताच महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे!

Sanofar Nayakawadi
  • बुलढाण्यात एयु फायनान्सकडून शेतकऱ्याला अमानुष शिवीगाळ
  • "भिकारड्या, लायकी नसेल तर कर्ज कशाला घेतलं?" ऑडिओ व्हायरल
  • सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी आक्रमक

Farmer Harassment: दुष्काळ आणि रोजगाराच्या गंभीर समस्येने आधीच कोलमडलेल्या शेतकऱ्याच्या जखमेवर फायनान्स कंपन्यांकडून मीठ चोळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात कर्जवसुलीच्या नावाखाली एका शेतकऱ्याला अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मानसिक त्रास दिल्याची आणि अपमानित केल्याची घटना उघडकीस आली आहे. एयु फायनान्स बँकेच्या (AU Finance Bank) वसुली कर्मचाऱ्याने केलेल्या या मुजोरीमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकरी वर्गात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.

ऑडिओ क्लिपमुळे मुजोरी उघड

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्याच्या पत्नीने बचत गटामार्फत कर्ज घेतले होते. या कर्जाचा हप्ता थकल्याने एयु फायनान्सच्या कर्मचाऱ्याने थेट शेतकऱ्याला फोन करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. "भिकारड्या, लायकी नसेल तर कर्ज घेतलं कशाला?" अशा अतिशय भयंकर आणि शिवराळ शब्दांचा वापर करत कर्मचाऱ्याने शेतकऱ्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, या शेतकऱ्याने हा संपूर्ण फोन कॉल रेकॉर्ड केला असून, ही धक्कादायक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शासकीय आदेश धाब्यावर; शेतकरी संघटना आक्रमक

एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून सक्तीची कर्जवसुली न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तरीदेखील खासगी फायनान्स कंपन्या आणि बँका शासकीय नियमांची पायमल्ली करत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. वसुली कर्मचाऱ्यांच्या अशा त्रासामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. "महाराष्ट्रात चाललंय तरी काय?" असा थेट सवाल उपस्थित करत दोषी कर्मचाऱ्यावर आणि संबंधित बँकेवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

💡Frequently Asked Questions

Que: बुलढाण्यात कोणत्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याचा छळ केला?
Ans: एयु फायनान्स बँकेच्या (AU Finance Bank) कर्जवसुली कर्मचाऱ्याने फोनवर शेतकऱ्याचा अपमान आणि शिवीगाळ केली.

Que: ही घटना कशामुळे घडली आणि काय पुरावा समोर आला आहे?
Ans: बचत गटामार्फत घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी कर्मचाऱ्याने फोन केला होता. या संभाषणाची शिवीगाळ असलेली ऑडिओ क्लिप शेतकऱ्याने रेकॉर्ड केली असून ती व्हायरल झाली आहे.

Que: या घटनेवर स्थानिक व शेतकरी संघटनांची काय प्रतिक्रिया आहे?
Ans: सरकारी आदेश असतानाही सक्तीची वसुली करून शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप करत संघटनांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका