सौजन्य फोटो - AI Gemini Railway Officer Home Theft
क्राईम

बाहेर गेल्याचा बनाव अन् मोबाईलवर लाईव्ह सीसीटीव्ही; घरकाम करणाऱ्या महिलेचा काळा डाव उघड; १०.७ तोळे सोने व रोकड लंपास!

बाहेर गेल्याचा बनाव अन् मोबाईलवर लाईव्ह सीसीटीव्ही! घरकाम करणाऱ्या महिलेचा डाव उघड; १०.७ तोळे सोने, चांदी व रोकड लंपास केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल...

Sanofar Nayakawadi
  • महिला रेल्वे अधिकाऱ्याच्या घरातून मोलकरणीने दागिने व रोकड लांबवली

  • लाईव्ह सीसीटीव्ही पाहून लॉकर उघडताना रंगेहात पकडले

  • एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रेल्वे विभागातील महिला अधिकाऱ्याच्या घरातून घरकाम करणाऱ्या महिलेनेच लाखोंचे दागिने आणि रोकड लांबवल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. संबंधित महिला अधिकारी आणि त्यांचे पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर घरकाम करणाऱ्या महिलेने डाव साधत ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

नीलिमा मनोज ठाकरे असे या रेल्वे महिला अधिकाऱ्याचे नाव असून त्या इंडोजर्मन टूल रूम क्वार्टर्समध्ये राहतात. मागील १० महिन्यांपासून सुनीता पडुळे (वय अंदाजे ४५, रा. मिसारवाडी) ही महिला त्यांच्या घरी साफसफाईचे काम करत होती. ऑक्टोबर महिन्यात दसऱ्यापूर्वी घरातील सोन्याचे दागिने हळूहळू गायब होण्यास सुरुवात झाली. घरात इतर कोणाचाही वावर नसताना वारंवार दागिने चोरीला जात असल्याने नीलिमा यांना घरकाम करणाऱ्या सुनीतावर संशय आला. मात्र, ठोस पुरावा नसल्याने त्यांनी थेट आरोप न करता घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आणि त्याचे लाइव्ह फुटेज मोबाईलवर पाहण्याची सोय केली.

बाहेर जाण्याचा बनाव अन् 'लाइव्ह' सापळ्यात अडकली

२४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीच्या सुट्टी दिवशी नीलिमा यांनी घराबाहेर जात असल्याचा बहाणा केला आणि त्या बाहेर थांबून मोबाईलवर सीसीटीव्हीचे लाइव्ह फुटेज पाहू लागल्या. यावेळी सुनीताने देवघरातील ड्रॉवरमधून कपाटाची चावी काढून कपाटातील सोन्याचे लॉकर उघडल्याचे स्पष्ट दिसले. हा प्रकार मोबाईलवर पाहताच त्यांनी तातडीने घरात जाऊन सुनीताला रंगेहात पकडले. मात्र, ती उडवाउडवीची उत्तरे देऊन तिथून निघून गेली.

१०.७ तोळे सोने, चांदी व रोकड लंपास

तपासणी केली असता या प्रकरणात तब्बल १०.७ तोळे सोन्याचे दागिने, ३२ भार चांदीचे दागिने आणि ५५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. नीलिमा ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून २४ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात सुनीता पडुळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरीची ही घटना कोठे घडली?

ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील इंडोजर्मन टूल रूम क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या महिला रेल्वे अधिकारी नीलिमा मनोज ठाकरे यांच्या घरी घडली.

या चोरीचा उलगडा कसा झाला?

वारंवार दागिने गायब होत असल्याने नीलिमा यांनी घरात सीसीटीव्ही बसवले होते; २४ नोव्हेंबर रोजी बाहेर जाण्याचा बहाणा करून त्यांनी मोबाईलवर लाईव्ह फुटेज पाहिले असता सुनीता पडुळे हिने कपाटाची चावी घेऊन लॉकर उघडल्याचे स्पष्ट दिसले.

या प्रकरणात काय ऐवज चोरीला गेला आणि गुन्हा कोठे दाखल झाला?

१०.७ तोळे सोन्याचे दागिने, ३२ भार चांदीचे दागिने आणि ५५ हजार रुपये रोकड चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले असून, एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात सुनीता पडुळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अखेर प्रतिक्षा संपली! WhatsApp यूजर्ससाठी मेसेज शेड्यूल फीचर रोलआऊट... कसं करणार काम? जाणून घ्या

चासकमान धरणातून वाढवला पाण्याचा विसर्ग; 550 क्युसेकने डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात

Fashion: परफ्यूम वापरताय? जाणून घ्या परफ्यूमचे विविध प्रकार आणि त्यांची खास वैशिष्ट्ये!

२६ नोव्हेंबर राशीभविष्य: आर्थिक लाभ, करिअर आणि प्रेमाच्या बाबतीत काय सांगतात ग्रह?

Revanath Maharaj: नवनाथांपैकी सातवे सिद्ध गुरू रेवणनाथ; जाणून घ्या जन्मकथा, गुरुभेट आणि संजीवन समाधीचे महत्त्व