Missing Doctor: सव्वा कोटींचा जमीन व्यवहार अन् ८० लाख दिले होते आगाऊ... बेपत्ता डॉक्टर यांची हत्या; गोणीत बांधून धरणात फेकला मृतदेह! Dr Sanjay Teli Murder Jalgaon, Pachora Missing Doctor Found Dead, Bahula Dam Body Found, Land Deal Murder Jalgaon, Pachora Police Arrest
क्राईम

Missing Doctor: सव्वा कोटींचा जमीन व्यवहार अन् ८० लाख दिले होते आगाऊ... बेपत्ता डॉक्टर यांची हत्या; गोणीत बांधून धरणात फेकला मृतदेह!

सव्वा कोटींच्या जमीन व्यवहारासाठी आले अन् सहा दिवस बेपत्ता झाले! पाचोरा येथील डॉक्टर संजय तेली यांचा गोणीत बांधलेला मृतदेह बहुळा धरणात सापडल्याने खळबळ; दोघांना अटक!

Sanofar Nayakawadi
  • बेपत्ता डॉक्टर यांचा गोणीत बांधलेला मृतदेह बहुळा धरणात सापडला

  • जमीन व्यवहारातील ८० लाखांच्या वादातून राहुलने सालदाराच्या मदतीने केली हत्या

  • पाचोरा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना अटक

Missing Doctor: जळगावच्या पाचोरा तालुक्यातील गोरडखेडा येथून सहा दिवसांपासून बेपत्ता झालेल्या डॉक्टर संजय तेली यांच्या हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, आज सकाळी बहुळा धरणातून गोणीत बांधलेला त्यांचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला. जमिनीच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सव्वा कोटींच्या व्यवहारासाठी आले आणि बेपत्ता झाले

१८ नोव्हेंबर रोजी एक कोटी २५ लाख रुपयांच्या जमिनीच्या व्यवहारासाठी डॉक्टर तेली गोरडखेडा येथे आले होते. त्यानंतर ते अचानक बेपत्ता झाल्याने पाचोरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन गोरडखेडा येथे मिळाले होते, तसेच त्यांची कारही परिसरात आढळली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला होता.

जमिनीच्या वादातून हत्या; मृतदेह लपविण्यासाठी सालदाराची मदत

पोलिसांनी संशयावरून राहुल धर्मराज पाटील याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सालदार संजय भील याने मदत केल्याचेही तपासात समोर आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीला जमिनीच्या व्यवहारापोटी ८० लाख रुपये दिले होते, अशी माहिती डॉक्टर तेली यांच्या कुटुंबीयांनी दिली असून, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

सहा दिवसांनंतर बहुळा धरणात सापडला मृतदेह

संशयितांनी मृतदेह धरणात फेकल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी काल दुपारपासून बहुळा धरणात शोधमोहीम सुरू केली होती. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते, मात्र अंधारामुळे अडथळे येत असल्याने शोधमोहीम थांबवून आज सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला. अखेर या शोधमोहिमेत गोणीत बांधलेला डॉ. संजय तेली यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या डॉक्टरांच्या हत्येचा छडा लावला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

बेपत्ता डॉक्टर संजय तेली यांचा मृतदेह कोठे आढळून आला?

पाचोरा तालुक्यातील गोरडखेडा येथून सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले डॉक्टर संजय तेली यांचा गोणीत बांधलेला मृतदेह आज सकाळी बहुळा धरणातून पोलिसांनी बाहेर काढला.

डॉक्टर संजय तेली यांची हत्या कोणत्या कारणातून झाली?

एक कोटी २५ लाख रुपयांच्या जमिनीच्या व्यवहारापोटी ८० लाख रुपये दिले असतानाही झालेल्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली.

या हत्याकांडात पोलिसांनी कोणाला अटक केली आहे?

पोलिसांनी मुख्य आरोपी राहुल धर्मराज पाटील आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत करणारा सालदार संजय भील या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

'झालं बाबा एकदाचं लग्न...' संतोष जुवेकरने दिली आनंदाची बातमी; VIDEO पाहून चाहतेही खुश

Pune Metro आता थांबणार नाय! 'या' मार्गावर दररोज ५० हजार प्रवाशांचा प्रवास

Sourav Ganguly : कुलदीप अथवा मानव कुठे आहेत? वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्यानंतर गांगुलींनी उपस्थित केला प्रश्न

Navi Mumbai News: बेलापूर न्यायालयात खळबळ! जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी; उपचारादरम्यान मृत्यू

बॅटने नुसती हाणामारी! Kieron Pollard ने टी 20 फॉर्मटमध्ये केला 'हा' रेकॉर्ड, बटलरचे स्थान धोक्यात