शिरूरमध्ये वकिलाचीच केली गेली 1.90 कोटींची फसवणूक; जमीन व्यवहारात घातला गंडा 
क्राईम

शिरूरमध्ये वकिलाचीच केली गेली 1.90 कोटींची फसवणूक; जमीन व्यवहारात घातला गंडा

महेश ढमढेरे यांनी त्यानुसार सदर रक्कम भरुन सदर जमिनीचे किरण काळे, मोनिका भट्टाचार्य व जयसिंग भंडारे याच्या उपस्थितीत अल्पेश पटेल यांच्या नावावर खरेदीखत करुन दिले. त्यावेळी हितेश याने कल्पेश यांच्या सहीचे एका फर्मच्या नावाने लाखो रुपयांचे काही चेक महेश ढमढेरे यांना दिले.

Krupadan Awale

- शिरूरमध्ये वकिलाची १ कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक

  • जमीन विक्रीच्या व्यवहारात बनावट धनादेशाचा वापर

  • तळेगाव ढमढेरे येथे घडली घटना

शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे एका वकिलाची जमीन विक्रीच्या व्यवहात बनावट चेक देऊन तब्बल एक कोटी 90 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अल्पेश किरीटभाई पटेल व हितेश वीराभाई पटेल या दोघांवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथे वकील असलेल्या महेश ढमढेरे व निमगाव म्हाळुंगीचे पोलीस पाटील किरण काळे या दोघांनी चार-चार एकर अशी आठ एकर जमीन घेतली होती, दर जमीन विक्री करायची असल्याचे किरण काळे यांनी हितेन पटेल या गुजराती व्यापाऱ्याला ढमढेरे यांच्याकडे आणले. हितेन पटेल याने ढमढेरे यांचे अल्पेश पटेल याच्याशी बोलणे करुन दिले. त्यांनतर सदर जमिनीचा ठरून खरेदीखताचे नियोजन झाले. मात्र, हितेन पटेल याने जमीन खरेदी खताचे वेळी येणारा नोंदणी शुल्क तीस हजार रुपये व स्टँप ड्युटी दहा लाख रुपये हे तुम्ही भरा. खरेदीखत नंतर सदर रक्कम तुम्हाला देतो, असे म्हटले.

त्यांनतर महेश ढमढेरे यांनी त्यानुसार सदर रक्कम भरुन सदर जमिनीचे किरण काळे, मोनिका भट्टाचार्य व जयसिंग भंडारे याच्या उपस्थितीत अल्पेश पटेल यांच्या नावावर खरेदीखत करुन दिले. त्यावेळी हितेश याने कल्पेश यांच्या सहीचे एका फर्मच्या नावाने लाखो रुपयांचे काही चेक महेश ढमढेरे यांना दिले. खरेदीखत झाल्यानंतर सदर चेक देखील त्याने बदलून मी तुम्हाला रोख रक्कम देतो असे म्हणून किरण काळे यांच्या उपस्थितीत काही चेक पुन्हा घेतले. मात्र, नोंदणी शुल्क व स्टँप ड्युटीची रक्कम देखील ढमढेरे यांना दिली नाही.

चेकच झाला बाउन्स

पुढील काही दिवस ढमढेरे यांनी पटेल यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच काही चेक बँकेत जमा केले असता ते पास न होता बाउन्स झाले. त्यामुळे अल्पेश पटेल याने त्याचा संबंध नसलेल्या एका कंपनीचे चेक देऊन जमीन खरेदीच्या व्यवहारात फसवणूक केल्याचे महेश ढमढेरे यांच्या निदर्शनास आले. याबाबत महेश विठ्ठलराव ढमढेरे (वय ४९, रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला.

FAQ

प्रश्न १ : शिरूरमध्ये किती रुपयांची फसवणूक झाली?
उत्तर : जमीन विक्रीच्या व्यवहारात वकिलाची तब्बल १ कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

प्रश्न २ : फसवणुकीची घटना कुठे घडली?
उत्तर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे जमीन विक्रीच्या व्यवहारात ही घटना घडली.

प्रश्न ३ : फसवणुकीच्या प्रकरणात कोणावर गुन्हा दाखल झाला आहे?
उत्तर : अल्पेश किरीटभाई पटेल आणि हितेश वीराभाई पटेल यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IND vs NZ: मैदानात उतरताच यशस्वी जैस्वालचा केला अनोखा विश्वविक्रम! सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे

IBM US Visa : अमेरिकेतील भारतीयांना दणका!'परत जा नोकरी सोडा' IBM ने बंद केली US व्हिसा,Green Card Sponsorship; आता काय होणार?

Ramayana Movie :२७ देशांमध्ये ‘रामायण’चा डंका! रणबीर कपूरच्या चित्रपटाने रचला इतिहास; भारतीय चित्रपटसृष्टीत नवा विक्रम

पदवी नाही, वैद्यकीय नोंदणीही नाही; तरीही रुग्णांवर उपचार सुरू! बोगस डॉक्टरला रंगेहात पकडले

Coconut Oil Flooring: नारळाच्या तेलापासून तयार होतंय घराचं फ्लोरिंग! दक्षिण भारतातील अनोखी पद्धत पाहून व्हाल थक्क