क्राईम

Mumbai Crime: ऑडिशनच्या नावाखाली अर्धनग्न फोटो मागितले; नंतर ब्लॅकमेल करून... ; मुंबईतील घटना

मुंबईत वेब सीरिज-चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवून तरुणींची फसवणूक. फेक निर्माता बनून आरोपीने पैसे व खाजगी फोटो घेत ब्लॅकमेल केलं. विकास बहल यांच्या नावाने बनावट अकाउंट वापरलं. खार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू.

वैष्णवी कामडी
  • फेक कास्टिंग कॉलद्वारे तरुणींकडून पैसे व खाजगी फोटो उकळले.
  • विकास बहल नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट, ओळख भासवून विश्वास जिंकला.
  • पोलिस तपास सुरू; तरुणींना सावधानता ठेवण्याचं आवाहन.

मुंबई: मुंबईतून फसवणुकीचा एक नवा प्रकार समोर आला आहे. मोठ्या चित्रपटात आणि वेब सिरीजमध्ये अभिनयाचं काम देण्याचं आमिष देऊन तरुणींची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. आरोपी हा ऑडिशनच्या बहाण्याने तरुणींना बिकिनीवरील तसेच त्यांचे अर्धनग्न फोटो मागायचा नंतर त्यांना बालमेल करायचा. मुंबईतील खार पोलिसांनी या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय नेमकं प्रकरण?

पीडित महिलांनी पोलिसांना सांगितले की, अज्ञात आरोपीने स्वतःची प्रसिद्ध निर्माता विकास बहल अशी ओळख सांगितली होती आणि या नावाने नावाने त्याचं इंस्टाग्राम अकाउंट देखील होतं. ऑडिशनच्या बहाण्याने बऱ्याच मुलींशी संपर्क साधल्यानंतर, आरोपीने कथित निवड प्रक्रियेचा भाग म्हणून पीडित तरुणींकडून बिकिनीवरील तसेच त्यांचे अर्धनग्न फोटो मागितले. त्यामुळे पीडित तरुणींनी आरोपीला निर्माता समजून त्याला पैसे दिली आणि काही खाजगी फोटो सुद्धा पाठवले आणि त्यांनतर आपला फोन आरोपी हा बंद करायचा. यातील कित्येक तरुणींना तर आरोपीने भेटण्यासाठी बोलवलं होतं. जेव्हा खरा निर्माता-दिग्दर्शक विकास बहल यांना त्यांच्या नावाने फसवणूक सुरू असल्याचे कळलं तेव्हा त्यांनी खार पोलिस ठाण्यात जाऊन एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली.

पोलिसांचं आवाहन

पीडित तरुणीने याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बनावट निर्मात्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याचा तपास सुरु केला आहे. फसवणूक, आयटी कायदा आणि महिलांचा छळ या कलमांखाली आरोपी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोपीचे पीडित तरुणींसोबत झालेल्या चॅट्स, त्याचे सोशल मीडिया अकाउंट, कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेज याचा तपास पोलीस करत आहेत. खार पोलिसांनी महिला आणि तरुणीना आवाहन केलं आहे की त्यांनी अधिकृत पुष्टीशिवाय कोणत्याही ऑडिशन किंवा कास्टिंग कॉलवर विश्वास ठेवू नये.

💡Frequently Asked Questions

Que: फसवणूक कशी केली जात होती?
Ans: ऑडिशन व काम देण्याचं आमिष दाखवून पैसे व फोटो मागवले, नंतर नंबर बंद केला.

Que: आरोपी कोणत्या नावाने स्वतःची ओळख देत होता?
Ans: प्रसिद्ध निर्माता विकास बहल असल्याचे भासवत होता.

Que: पोलिसांनी पुढे काय कारवाई केली?
Ans: खार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोशल मीडिया, चॅट्स, CCTV तपासत तपास सुरू केला.

Satara News: युती केली नसती तर आमचे सात संचालक निवडून आले असते; जयकुमार गोरे

गुन्हा सिद्ध न होताच 77 टक्के कैदी भोगताहेत कारावास; कैद्यांना अजूनही निकालाची प्रतीक्षाच

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मोठी बातमी ! जाणीवपूर्वक हटवली होती राजीव गांधी यांची सुरक्षा; राहुल गांधींचा गंभीर आरोप

Winter Food: थंडीच्या दिवसांमध्ये तहान लागत नाही? मग शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन