धक्कादायक ! गळा आवळून मजुराची हत्या; CCTV फुटेज समोर येताच झाला प्रकरणाचा उलगडा 
क्राईम

Pune Crime: पुण्यात हत्येचं सत्र सुरु! चुलत भावाकडून तरुणाची हत्या, मृतदेह पोत्यात भरला आणि...

कात्रज-गुजरवाडीत चुलत भावाकडून तरुणाची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून रस्त्याकाठी फेकला. मृतक अजय पंडित तर आरोपी अशोक पंडित असून पोलिसांनी त्याला पिंपरी चिंचवडेतून अटक केली आहे. आपसी वादातून हत्या झाल्याचा अंदाज.

वैष्णवी कामडी
  • रस्त्याकाठी संशयास्पद पोते आढळल्याने हत्या प्रकरणाचा उलगडा.
  • आरोपी अशोकनेच अजय पंडितची हत्या केल्याची कबुली.
  • दोघेही झारखंडचे असून पोलिसांचा तपास सुरू.

पुणे:  पुणे शहरातील कात्रज- गुजरवाडी परिसरात चुलत भावाकडून तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत व्यक्तीचे नाव अजय पंडित असे आहे. तर आरोपीचे नाव अशोक पंडित असे आहे. आरोपीला पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून अटक केली आहे.  दोघेही झारखंडचे रहिवासी असून काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होते. आरोपी अशोक पंडितला पुणेपोलीस पुढील तपास करत आहे.

काय घडलं नेमकं?

गुजर निंबाळकरवाडी येथे रस्त्याकाठी संशयास्पद पोते आढळून आले. याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपास सुरु केला. मयत तरुणाचे नाव अजय पंडित असल्याचे समोर आले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अशोक पंडितने याला अटक केली आहे. त्याने कबूल केले की त्याने भावाची हत्या करत मृतदेह पोत्यात भरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गुजरवाडी येथे फेकून दिला होता.

आपसी वादातून हत्या

मृतक आणि आरोपी तरुण हे दोघेही चुलत भाऊ असून ते झारखंड येथील राहणारे आहेत. तरुणाने त्यांच्या आपसी वादातून हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपी अशोक पंडित याला पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पुण्यात मध्यरात्री कोयत्यांचा थरार; एरंडवणेतील रेस्टोबारवर टोळक्याचा हल्ला

पुणे शहरातून अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे. हत्या, चोरी, दहशत माजवणे, मारहाण, अत्याचार अश्या अनेक घटना आपल्याला दैनंदिन जीवनात ऐकायला मिळतात. या गुन्हेगारी कृत्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता घरातून पडायचं की नाही असा प्रश्न पडला आहे. आता पुन्हा एकदा दहशत माजवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एरंडवणे परिसरात रात्री दीडच्या सुमारास अनंत रेस्टोबारवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला. या टोळक्याच्या हातात कोयते आणि दांडके होते. सशस्त्र असलेल्या या गुंडांनी परिसरात दहशत माजवत रेस्टोबारमध्ये हैदोस घातला. यावेळी त्यांनी बारमध्ये असलेल्या लोकांना धमकावलं. त्यांना शस्त्र दाखवली. ऐवढेच नाही तर फोडतोड ही केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने तिथे उपस्थित असलेले ग्राहक हादरून गेले.

💡Frequently Asked Questions

Que: हत्या कुठे घडली?
Ans: कात्रज

Que: आरोपी कोण?
Ans: अशोक

Que: दोघांचे नाते काय?
Ans: चुलतभाऊ

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम

Fashion: पश्मीना शाल खरेदी करताय? जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य, प्रकार आणि ओळखण्याच्या 'या' खास टिप्स

वाळू माफियांची मुजोरी! महसूल अधिकाऱ्याला रॉड अन् दांडक्याने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई