सौजन्य फोटो - AI Gemini Gold Theft
क्राईम

दागिने घडवण्याचे काम मिळाले आणि कोट्यवधींचा ऐवज घेऊन झाले गायब! रविवार पेठेत खळबळ

विश्वासाचा घात! ७८० ग्रॅम गंठणासाठी दिलेले २२ कॅरेट सोने घेऊन चार कारागीर पसार; ४२ लाख ९२ हजारांचा गंडा घालणाऱ्या पश्चिम बंगालच्या चौघांवर फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल.

Sanofar Nayakawadi
  • रविवार पेठेतील दुकानातून चार कर्मचाऱ्यांनी ४२.९२ लाखांचे सोने घेऊन पळ काढला

  • गंठणाच्या कामासाठी दिलेले २२ कॅरेट सोने घेऊन ११ सप्टेंबर रोजी केला पोबारा

  • चौघांविरुद्ध फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल करून शोध सुरू

पुणे: पुण्यातून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील रविवार पेठ परिसरात दागिने घडवण्याचे काम करणाऱ्या पश्चिम बंगाल येथील चार कर्मचाऱ्यांनी मालकालाच गंडा घातला. कर्मचाऱ्यांनी तब्बल ४२ लाख ९२ हजार रुपये किमतीचे सोने घेऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार झालेल्या चौघा आरोपींचा शोध सुरू आहे.

नेमका काय घडला प्रकार?

सप्टेंबर महिन्यात तक्रारदारांना एका सराफ व्यावसायिकाकडून ७८० ग्रॅमचे सोन्याचे गंठण तयार करण्याचे काम मिळाले होते. त्यानुसार २२ कॅरेट सोन्याची लगड या चार कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली होती. ११ सप्टेंबर रोजी रविवार पेठेतील 'श्रीकृष्ण गोल्ड स्मिथ' दुकानातून या चौघा आरोपींनी सोन्याच्या दोन लगडी घेऊन पोबारा केला. या सोन्याची किंमत ४२ लाख ९२ हजार रुपये इतकी आहे.

चौघा आरोपींविरुद्ध गुन्हा; पोलिसांचा शोध सुरू

मंगळवार पेठ येथील रहिवासी असितकुमार गणेश पोरीया (वय ४७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सैकत पांजा (वय २५), सजुल पाजा (वय २२), अभिजित दास (वय २०) आणि सौरभ बेरा (वय २५, सर्व रा. पश्चिम बंगाल) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फरासखाना पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

रविवार पेठेत किती रुपयांचे सोने घेऊन कारागीर पसार झाले?

तब्बल ४२ लाख ९२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन लगडी घेऊन चार कर्मचारी पळून गेले आहेत.

हे सोने कोणत्या कामासाठी देण्यात आले होते?

एका सराफ व्यावसायिकाकडून ७८० ग्रॅमचे सोन्याचे गंठण तयार करण्याचे काम मिळाले होते आणि त्यासाठी २२ कॅरेट सोन्याची लगड कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली होती.

या प्रकरणात कोणाविरुद्ध आणि कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे?

सैकत पांजा, सजुल पाजा, अभिजित दास आणि सौरभ बेरा या चौघांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

California Earthquake : कॅलिफोर्निया शक्तिशाली भूकंपाने हादरले! विमानतळावर उडाला गोंधळ, उतरणारी विमाने वळवली; 2014 नंतरचा सर्वात मोठा धक्का

आता मुलांच्या X अकाऊंटवर पालकांचा कंट्रोल! तब्बल 20 वर्षांनंतर पॅरेंटल कंट्रोल फीचर रिलीज... जाणून घ्या सविस्तर

रोजगारासाठी परजिल्ह्यात धाव! एमआयडीसीत मोठ्या उद्योगाची कमतरता; लघु, मध्यम उद्योगावरच भिस्त

Vasai Virar Sports Complex : क्रीडा संकुलाच्या नावावरून वसई-विरार महापालिकेत मोठा राडा! कोणाच्या बाजूने किती पडली मते?

Ganga Godavari Temple: १२ वर्षांनीच भाविकांसाठी उघडते गंगा गोदावरी मातेचे मंदिर; जाणून घ्या ७०० वर्षांचा इतिहास