क्राईम

पुण्यात भरदिवसा गोळीबार; शिवाजीनगर कोर्टाबाहेर घडला थरार, एक जखमी

गजबजलेल्या शिवाजीनगर न्यायालय परिसरात गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार! यात दोघे जखमी; घटनास्थळी दोन बंदुका सापडल्यानंतर पोलिसांची नाकेबंदी व आरोपींचा शोध सुरू

Sanofar Nayakawadi

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात गोळीबाराची अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. चार ते सहा जणांच्या टोळक्याने बंदुका आणि कोयते घेऊन एका व्यक्तीवर हल्ला केला. गोळीबारानंतर संबंधित व्यक्तीवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात त्याचे दोन्ही हात छाटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत आणखी दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ टोळक्याची दहशत

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर आरोपींची संख्या सहा जणांच्या आसपास होती. हे आरोपी बंदुका आणि कोयते घेऊन थेट न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आले होते. न्यायालयाच्या परिसरात नेहमीच नागरिकांची, वकिलांची आणि पक्षकारांची मोठी गर्दी असते. अशा गजबजलेल्या आणि वर्दळीच्या ठिकाणीच हा रक्तरंजित हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ आणि घबराट उडाली.

पोलिसांची नाकेबंदी; घटनास्थळी दोन बंदुका सापडल्या

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची कडक नाकेबंदी करून घटनास्थळ सील केले आहे. तपासादरम्यान घटनास्थळी दोन बंदुका आणि काही गोळ्या आढळून आल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू करण्यात आला आहे.

IPL 2027 Auction: 66 जागा अन् 1220 दावेदार! IPL 2027 ऑक्शनमध्ये पैशांचा पाऊस पडणार; कोणत्या खेळाडूंचं नशीब चमकणार?

भारतीय बाजारात Motorola चा नवा डाव; 144Hz डिस्प्लेसह जबरदस्त स्मार्टफोन लाँच, किंमत आणि फीचर्स पाहून व्हाल थक्क

JSW Motors New Logo: जेएसडब्ल्यू मोटर्सचा नवा लोगो सादर; पहिली SUV 3 डिसेंबरला येणार!

दिलासादायक ! पुणे मेट्रो मार्गिका 3 वरील आणखी दोन स्थानके प्रवाशांसाठी आज होणार खुली

Nikhil Damle: ‘२०२६ मध्ये वाचनाची गोडी वाढली, मराठा इतिहासाचा घेतला सखोल अभ्यास’, निखिल दामलेचा वर्षभरातील खास अनुभव