फोटो सौजन्य- सोशल मीडिया  
क्राईम

Pune Yeolewadi Crime: पुण्यात येवलेवाडीत वनरक्षकाला 'या' कारणास्तव धमकी; कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल

Pune Yeolewadi Crime: पुण्याच्या येवलेवाडीतील वन जमिनीवरील अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या वनरक्षकाला जमावाने धमकवून अट्रोसिटीची धमकी दिली. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रेया देशमुख

Pune Yeolewadi Crime: पुण्याच्या येवलेवाडी परिसरातील वन जमिनीवर झालेल्या नवीन अतिक्रमणाची पाहणी व मोजमाप करण्यासाठी गेलेल्या एका वनरक्षकाला १५ ते २० जणांच्या जमलेल्या जमावाने धमकवल्याची घटना घडली आहे. सरकारी कर्तव्यात अडथळा आणत आरोपींनी वनरक्षकाला शिवीगाळ केली, तसेच अट्रोसिटी व खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनधिकृत अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांसोबत वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार श्रीराम महादेव जगताप (३४, वनरक्षक) हे ९ ऑक्टोबर रोजी येवलेवाडी येथील फॉरेस्ट गट नंबर १८ मधील नवीन अतिक्रमणाचे निरीक्षण व मोजमाप करण्यासाठी गेले होते. यादरम्यान, त्याठिकाणी अनधिकृत अतिक्रमण करून राहणाऱ्या १५ ते २० अज्ञात महिला आणि पुरुषांनी एकत्रित येऊन त्यांच्यासोबत वाद घातला.

सरकारी कर्मचाऱ्याला धक्काबुक्की व दमदाटी

शासकीय कामकाज पार पाडत असताना आरोपींनी सरकारी कर्मचाऱ्याला धक्काबुक्की व दमदाटी केली. तसेच खोट्या गुन्ह्यांत आणि ॲट्रोसिटीच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Pune Accident: खूप वाईट बातमी! बसस्टॉपवर मुलं उभी अन् ट्रक आला आणि थेट...; 3 जणांचा चिरडून मृत्यू

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कामगिरी; दक्षिण कोरियामध्ये करणार प्रतिनिधित्व

Business News : फ्लिपकार्टमध्ये मोठा नेतृत्वबदल; CEO कल्याण कृष्णमूर्ती पद सोडणार; ११ वर्षांच्या प्रवासाला पूर्णविराम

Viral Knife Attack Video : हळदी समारंभात पत्रकारावर चाकूने हल्ला; व्हिडिओ व्हायरल

Dharashiv Water Storage : धाराशिवचा पाणीसाठा 5.14 टक्क्यांवर; आठ महिन्यांचे नियोजन करा! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश