arrested  
क्राईम

पुण्यात पिस्तूल विक्रीचा डाव उधळला! दोघांना सापळा रचून पकडले; तीन गावठी पिस्तुले जप्त

पुण्यात सराईत गुन्हेगारांकडून पिस्तूल विक्रीचा सुरू असलेला डाव अमली पदार्थ विरोधी पथकाने उधळून लावला आहे. पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे.

Dnyaneshwar more

पुणे : पुण्यात सराईत गुन्हेगारांकडून पिस्तूल विक्रीचा सुरू असलेला डाव अमली पदार्थ विरोधी पथकाने उधळून लावला आहे. सोमवार पेठेतील सार्वजनिक रस्त्यावर पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे. त्यांच्याकडून तीन गावठी बनावटीची लोखंडी पिस्तुले, आठ जिवंत काडतुसे, दुचाकी आणि दोन मोबाइल हँडसेट असा एकूण २ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शाहरुख सैफान शेख (वय २७, रा. इशारतबाग, एनआयबीएम रोड, गल्ली क्रमांक ४, मोहम्मदवाडी) आणि साथीदार प्रभू लक्ष्मण गुगल जेढी (वय ३५, रा. १३१४, कसबा पेठ, सूर्या हॉस्पिटलजवळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८२/२०२५ नोंदविण्यात आला आहे. भारतीय हत्यार कायद्याचे कलम ३(२५), महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम ३७(१)(२)(३) सह १३५ आणि भारतीय न्याय संहितेचे कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक योगेश कोतकर तसेच पोलिस अंमलदार अमोल सरडे, अक्षय शिर्के व त्यांच्या पथकाने केली आहे.

पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकचे अधिकारी आणि कर्मचारी शहरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार अमोल सरडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार शाहरुख शेख आणि त्याचा साथीदार प्रभू जेढी हे सोमवार पेठेतील एका दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर पिस्तूल विक्रीसाठी येणार आहेत. यानुसार, पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून ३ गावठी बनावटीची लोखंडी पिस्तुले आणि ८ जिवंत काडतुसे आढळून आली. याशिवाय होंडा कंपनीची डिओ दुचाकी आणि दोन मोबाइल हँडसेटही जप्त करण्यात आले.

पुण्यात पिस्तूल विक्रीप्रकरणी किती जणांना अटक करण्यात आली?

शाहरुख शेख आणि प्रभू जेढी या दोघांना सोमवार पेठेतून अटक करण्यात आली.

आरोपींकडून काय जप्त करण्यात आले?

तीन गावठी पिस्तुले, आठ जिवंत काडतुसे, एक दुचाकी आणि दोन मोबाइल असा २ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई कोणत्या पोलिस पथकाने केली?

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथक एकने ही कारवाई केली.

SL A vs PAK A : श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला रडवंल, आता फलंदाजांवर असणार ट्रॉफी जिंकण्याची मदार

इलेक्ट्रिक वाहनांमुळे ऑटो डीलर्सच्या कमाईवर परिणाम; वाढता खर्च आणि कमी सर्व्हिस उत्पन्नामुळे चिंता

Accident: रखडलेल्या रस्ताकामाचा बळी? कार उलटून २२ वर्षीय तरुणाचा करुण अंत; महामार्गाच्या कामाविरोधात ग्रामस्थांचा संताप

Biscuit pudding: ओव्हनशिवाय घरच्या घरी बनवा चॉकलेट बिस्किट पुडिंग, चवीला लागेल एकदम भन्नाट!

Top 5 Stocks Weekly Return : लाल रंगात बाजार असतानाही हे 5 शेअर्स सुसाट! एकाच आठवड्यात तब्बल 69% पर्यंत रिटर्न; नंबर 1 वर कोण?