Entertainment

Hema Malini: 'माझं दुःख अजूनही कमी झालेलं नाही...' धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनींचं काळीज हेलावणारं वक्तव्य

बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त पत्नी हेमा मालिनी यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी धर्मेंद्र यांचं निधन झालं होतं. त्यांच्या आठवणीत हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर दोघांचे काही खास फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Riddhi Vanne
  • धर्मेंद्र यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त हेमा मालिनींची भावुक पोस्ट.

  • पतीच्या आठवणीत शेअर केले खास फोटो.

  • 'तुमच्याशिवाय आयुष्य रिकामं वाटतंय', म्हणत व्यक्त केल्या भावना.

Hema Malini On Dharmendra's first Anniversary: बॉलिवूडचे खरे ही-मॅन म्हणजे धर्मेंद्र आज त्यांची पहिली पुण्यतिथी. त्यांना जाऊन आज बरोबर एक वर्ष झालं. 24 नोव्हेंबर 2025 ला धर्मेंद्र यांनी या जगाचा निरोप घेतला. तेव्हा त्यांचं वय 89 होतं. त्यांच्या आठवणीत हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे काही जुने, खास क्षणांचे फोटो पण शेअर केलेत.

हेमा मालिनींच्या मनातलं काय?

हेमा मालिनी यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, "तुम्ही गेल्याला एक वर्ष होऊन गेलं, पण तरीही मनातलं दुःख काही कमी होत नाही. तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही. तुम्ही फक्त माझे नवरा नव्हतात, तुम्ही माझं सगळं काही होतात. माझे दोस्त, माझे गुरू, माझे तत्वज्ञ आणि माझा मोठा आधार होतात. एका शब्दात सांगायचं तर तुम्हीच माझं अख्खं जग होतात. तुमच्याशिवाय आता सगळं आयुष्य सुन्न वाटतंय. तुमचं रुबाबदार असणं, तुमचा चांगुलपणा, भेटेल त्याच्यावर प्रेम करायची तुमची सवय... तुम्ही खरंच वेगळेच माणूस होतात."

मातीशी नाळ कधीच तुटली नाही

पुढे हेमा मालिनी म्हणतात, "इतकं मोठं यश मिळवून सुद्धा तुम्ही कधीच हवेत गेला नाहीत. कायम जमिनीवर राहिलात. आपल्या मातीशी, आपल्या गावाशी असलेलं नातं तुम्ही कधीच तोडलं नाही. गीतेत म्हटलंय आत्मा कधीच मरत नाही, तो परत जन्म घेतो. माझा पण त्यावर विश्वास आहे. पण मी अजून याच जन्मात आहे ना, त्यामुळे तुमच्या सोबत घालवलेल्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या मोठ्या मनाच्या, प्रेमळ माणसाला आठवणाऱ्या आणि धर्मजी तुमच्यासाठी काय होते हे इतक्या प्रेमाने सांगणाऱ्या लाखो चाहत्यांचे मी मनापासून आभार मानते."

60 वर्षं सिनेमावर अधिराज्य

धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 ला निधन झालं. 89 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. तब्बल सहा दशकं त्यांनी बॉलिवूड गाजवलं. 'शोले', 'दादागिरी', 'आग ही आग', 'जीने नही ढुंगा', 'धर्म और कानून', 'बर्निंग ट्रेन' अशा कितीतरी सिनेमांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या. त्यांच्या जोरदार अॅक्शनमुळेच लोक त्यांना बॉलिवूडचा ही-मॅन म्हणायचे.

शेवटचे दोन हिट सिनेमे

अलिकडेच त्यांचे 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' हे दोन सिनेमे जबरदस्त हिट झाले होते. आणि 'इक्कीस' हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. आज पहिल्या पुण्यतिथीला सगळ्या चाहत्यांच्या डोळ्यासमोर परत एकदा धर्मेंद्र यांचा तोच हसरा चेहरा येतोय.

Japanese Couple Viral Video : घटस्फोटानंतर चार वर्षांनी पुन्हा प्रेम जुळले! जपानी जोडप्याने लखनौमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार केले लग्न

Tarali Project Controversy: तारळी प्रकल्पाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; सयाजी शिंदेंनी उघडला कायदेशीर लढ्याचा मोर्चा!

FSSAI Action Against Bisleri: बापरे...! बिस्लेरीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत घटक; कंपनीवर गुन्हा दाखल

Lions Viral Video : आजूबाजूला सिंहच सिंह, तरीही बाईकस्वार बिनधास्त पुढे; झांबियातील थरारक व्हिडिओ व्हायरल

PM Modi Balen Shah Meet: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना पीएम मोदींची मोठी भेट! IIT कॅपसबाबत घेतला 'हा' मोठा ऐतिहासिक निर्णय