‘येतेच आता मी नांदायला’चा प्रोमो व्हायरल ( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)  
Entertainment

Marathi New Serial: सासू-सुनेची OG जोडी पुन्हा एकत्र! ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi New Serial: ‘माहेरची साडी’मधील अलका कुबल आणि उषा नाडकर्णी यांची जोडी तब्बल ३५ वर्षांनी पुन्हा एकत्र आली आहे. ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत असून, मालिका ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

अमृता यादव

Marathi New Serial: झी मराठी गेल्या अनेक दशकांपासून आपल्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. वाहिनीवरील अनेक मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आता प्रेक्षकांच्या भेटीला आणखी एक नवी मालिका येत असून, या मालिकेच्या निमित्ताने एका जुन्या गाजलेल्या जोडीचे पुनरागमन होणार आहे. ‘माहेरची साडी’ या चित्रपटातील अलका कुबल आणि उषा नाडकर्णी ही लोकप्रिय जोडी तब्बल ३५ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आली आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

‘माहेरची साडी’मधील गाजलेला सीन पुन्हा केला रिक्रिएट

झी मराठीवरील ‘येतेच आता मी नांदायला’ या नव्या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मालिकेच्या प्रमोशननिमित्त उषा नाडकर्णी आणि अलका कुबल यांनी ‘माहेरची साडी’ चित्रपटातील एक गाजलेला सीन पुन्हा रिक्रिएट केला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे उषा नाडकर्णी अलका कुबल यांना विहिरीत ढकलण्यासाठी पुढे येताना दिसतात. मात्र, यावेळी अलका कुबल यांचे त्यांच्याकडे लक्ष जाते आणि उषा नाडकर्णी थांबतात.

यानंतर दोघींमध्ये मजेशीर संवाद रंगतो. या संवादातून जुन्या चित्रपटातील आठवणींना उजाळा मिळतो. विशेष म्हणजे, या व्हिडीओच्या शेवटी अलका कुबल झी मराठीच्या नव्या मालिकेची घोषणा करतात. त्यामुळे हा प्रोमो चाहत्यांसाठी खास ठरत आहे.

३० नोव्हेंबरपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठीने हा खास प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तब्बल ३५ वर्षांनंतर अलका कुबल आणि उषा नाडकर्णी यांना पुन्हा एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘माहेरची साडी’मधील या लोकप्रिय जोडीला पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

‘येतेच आता मी नांदायला’ ही मालिका ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता ही मालिका झी मराठीवर पाहायला मिळेल. या मालिकेत उषा नाडकर्णी यांच्यासोबत हर्षद अतकरी आणि पूजा बिरारी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

केरळ काँग्रेसमध्ये अंतर्गत असंतोष वाढला; राहुल गांधी आणि खर्गेंना भेटणार प्रदेशाध्यक्ष

Mahatma Phule Punyatithi: आज महात्मा जोतिराव फुले यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २८ नोव्हेंबरचा इतिहास

Vastu Tips: जुन्या कपड्यांचा घरात पुसणी म्हणून वापर करताय? चुकूनही करू नका ही चूक; सुख-समृद्धीवर होऊ शकतो परिणाम

राजकमल रेल्वे पुलाचे पाडकाम अंतिम टप्यात! बांधकाम पूर्ण होईपर्यंत रेल्वे स्टेशन चौक-बेलपुरा मार्ग बंद

केसांची वाढ खुंटली आहे? मग सकाळी उठल्यानंतर नियमित खा 'हे' पदार्थ, १५ दिवसांमध्ये दिसून येईल सकारात्मक बदल