Dwidha Marathi Movie : भांडणं, मस्ती, एकमेकांची खेचणं आणि गरजेच्या वेळी खंबीर साथ… भाऊ-बहिणीचं नातं हे नेहमीच खूप खास असतं. लहानपणापासून हा बॉन्ड नेहमी खास असतो. रोजचा दंगा, खट्ट्याळपणा, एकमेकांसोबत भांडण आणि प्रसंगी एकमेकांसाठी ढाल बनून उभं राहणं... या नात्यात जेवढा हट्टीपणा असोत तितकीच त्याला भावनिक जोडही असते. रक्षाबंधनाच्या या पवित्र आणि सणाच्या काळात भाऊ-बहिणीच्या याच हळव्या आणि सुरेख नात्याचा जपणारा आणि त्यातील खट्ट्याळपणा उलगडणारा 'द्विधा' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. ( Dwidha Marathi Movie )
चित्रपटामध्ये अभिनेता निमिष कुलकर्णी अभिनेत्री मानसी कुलकर्णी मुख्य भूमिकेत असणार आहेत. निमिष हा 'आदित्य' आणि मानसी 'श्रावणी' ही व्यक्तिरेखा साकारली आहे. कथानकात दोघेही आत्येभाऊ-बहिणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. लहानपणापासून एकत्र वाढलेल्या या दोघांमधील जिव्हाळा, आपुलकीचं नातं, विश्वासाचे धागे आणि आठवणींची प्रसंग चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. त्यांच्यातील गोड खट्याळ नातं प्रेक्षकांना आपलंस करणार एवढं नक्की. त्यांचा संवाद, मजेशीर नोकझोक आणि संकटाच्या वेळी एकमेकांना मिळणारी खंबीर साथ थेट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारी ठरणार आहे.
पडद्यावर दिसणारी ही केमिस्ट्री फक्त पडद्यापुरती मर्यादित राहिलेली नाही तर या दोन्ही कलाकारांनी ऑफस्क्रीनही तितकाच दंगा केलेला आहे. त्यांच्यातील हा सहज संवाद आणि मित्रत्वाचे नातं प्रेक्षकांना म्हणून आपलंस करणार आहे. त्यामुळे चित्रपटातील बरेच प्रसंग यातून अधिक जिवंत होणार आहेत.
कौटुंबिक नात्यांमधील प्रेम, गोड आठवणी आणि भावनांची सुंदर गुंफण अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना फार वाट पाहावी लागणार नाही. हा 'द्विधा' चित्रपट येत्या ४ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या भावंडांसोबत 'आदि आणि श्रावणी'ची हा चित्रपट बघायला मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला घेऊन हा चित्रपट बघायला जाण्याची मज्जाच काही वेगळी असणार आहे. खास रक्षाबंधनाच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने बहिण भावाचं नात उलघडण्यासाठी जा तुम्हाला तुमच्या नात्याची आठवण नक्की येईल.