( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)  
Entertainment

Divyanka Bedi Wedding: बॉलिवूडच्या दिग्गज खलनायकाच्या घरी लगीनघाई! रंजीत यांची मुलगी दिव्यांका अडकली विवाहबंधनात

Divyanka Bedi Wedding:बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक रणजीत यांची मुलगी दिव्यांका बेदी अपूर्व माथूरसोबत विवाहबंधनात अडकली. लाल बनारसी साडीतील तिचा ब्रायडल लूक आणि लग्नातील व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

अमृता यादव

Divyanka Bedi Wedding: बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक रणजीत यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्यांची मुलगी दिव्यांका बेदी हिने तिचा दीर्घकाळचा प्रियकर अपूर्व माथूर याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीने आपल्या आयुष्यातील हा खास दिवस साजरा केला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, दिव्यांकाच्या हटके ब्रायडल लूकची विशेष चर्चा रंगली आहे.

दिव्यांकाचा हटके ब्रायडल लूक चर्चेत

दिव्यांकाने लग्नासाठी पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइलचा सुंदर मेळ साधला होता. तिने लाल रंगाची बनारसी साडी नेसली होती. या साडीसोबत तिने गुलाबी रंगाचा ट्यूब टॉप परिधान केला होता. हलके दागिने आणि मांगटिक्याने तिने आपला लूक पूर्ण केला. तिची मेसी बन हेअरस्टाईलदेखील लक्षवेधी ठरली. तिच्या या अनोख्या ब्रायडल लूकने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दुसरीकडे, अपूर्वाने लाल रंगाची शेरवानी परिधान केली होती. या शेरवानीवर सुंदर भरजरी भरतकाम करण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषेतील या जोडप्याचा लूक चाहत्यांना भावत आहे.

वडील रणजीत यांच्यासोबत दिव्यांकाची ग्रँड एन्ट्री

दिव्यांकाच्या लग्नातील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ढोलाच्या गजरात दिव्यांका तिचे वडील रणजीत यांच्यासोबत लग्नसमारंभात एन्ट्री करताना दिसत आहे. लेकीच्या या खास क्षणी रणजीतदेखील तिच्यासोबत आनंदाने सहभागी झालेले पाहायला मिळतात.

लग्नातील आणखी एका फोटोमध्ये दिव्यांका आणि अपूर्वा एकमेकांना वरमाळा घालताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका फोटोत अपूर्वा दिव्यांकाच्या भांगेत सिंदूर भरताना दिसत आहे. या खास क्षणांनी त्यांच्या लग्नसोहळ्याची झलक चाहत्यांना पाहायला मिळत आहे.

दीर्घकाळाच्या प्रेमानंतर बांधली लग्नगाठ

दिव्यांका बेदी आणि अपूर्वा माथूर हे काही काळापासून एकमेकांना डेट करत होते. अखेर आता दोघांनी लग्न करून आपल्या नात्याला नवे नाव दिले आहे. त्यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील कलाकारांची मोठी उपस्थिती नसली, तरी या खास सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. दिव्यांकाच्या साध्या पण हटके लग्नसोहळ्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Space War : चीनच्या मदतीने पाकिस्तान अंतराळात वाढवत आहे लष्करी ताकद; CDS जनरल सुब्रमणी यांचा गंभीर इशारा, मांडली 'ती' 3 मोठी आव्हाने

Nagpur News : एमबीबीएसची बनावट पदवी; ChatGPT चा वापर, ६ महिने जीएमसीत डॉक्टर म्हणून नोकरी

Pune News: शिक्षण विभागाचा मोठा दणका! पुणे विभागातील 'या' शाळांची होणार फेरपटपडताळणी; दोषी आढळल्यास होणार थेट कारवाई

'३ वर्षे दोन्ही राष्ट्रवादीचं भांडणाचं नाटक...', राज ठाकरेंचा डिलिमिटेशन बिलावरून NCPवर घणाघात

Cricket News: निकिता सिंगची 80 रन्सची तुफानी खेळी अन्...; ऑक्सिरीच करंडकच्या फायनलमध्ये 'हे' संघ