श्रद्धाच्या लूकची किंमत ऐकून व्हाल थक्क ( फोटो सौजन्य-सोशल मीडिया) 
Entertainment

Shraddha Kapoor Marathi Look: ५ लाखांचा चोकर, दीड लाखांची साडी अन्... श्रद्धा कपूरच्या मराठमोळ्या लूकची किंमत ऐकून बसेल धक्का!

Shraddha Kapoor Marathi Look: श्रद्धा कपूरच्या मराठमोळ्या लूकची सोशल मीडियावर चर्चा! हिरव्या नऊवारी साडीची किंमत १.२५ लाख, तर चोकरची किंमत तब्बल ५.५० लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे.

अमृता यादव

Shraddha Kapoor Marathi Look: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या ४ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, श्रद्धा सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतेच तिने कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्याआधी श्रद्धाने पुण्यातील एका खास कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील तिच्या मराठमोळ्या लूकने सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हिरव्या नऊवारीत श्रद्धाचा मराठमोळा अंदाज

पुण्यातील कार्यक्रमासाठी श्रद्धाने हिरव्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली होती. त्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज, गळ्यात आकर्षक चोकर आणि पारंपरिक दागिने असा तिचा लूक होता. साधा पण तितकाच देखणा असलेला तिचा हा मराठमोळा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र, तिच्या या लूकची किंमत समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

साडीपासून चोकरपर्यंत प्रत्येक गोष्ट लाखोंची!

‘फिल्मडॉम’च्या पोस्टनुसार, श्रद्धाने परिधान केलेल्या हिरव्या नऊवारी साडीची किंमत तब्बल १ लाख २५ हजार रुपये आहे. तर तिच्या ब्लाऊजची किंमत ३५ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय तिने घातलेल्या कोल्हापुरी डिझाइनच्या सँडलची किंमत ८५ हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

श्रद्धाच्या दागिन्यांच्या किमतीही तितक्याच महागड्या आहेत. तिच्या हातातील पांढऱ्या डायमंड डिझाइनच्या बांगड्यांची किंमत ६५ हजार रुपये, तर गळ्यातील चोकरची किंमत तब्बल ५ लाख ५० हजार रुपये असल्याचे म्हटले जात आहे. एवढेच नाही, तर तिच्या कानातल्यांची किंमतही १ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती आहे.

आंबाडा आणि फुलांनी पूर्ण केला लूक

श्रद्धाने आपल्या या पारंपरिक लूकसाठी खास हेअरस्टाइल केली होती. केस मोकळे न सोडता तिने सुंदर आंबाडा बांधला होता आणि त्यात फुलं माळली होती. हिरवी नऊवारी, पारंपरिक दागिने आणि फुलांनी सजवलेला आंबाडा यामुळे तिचा मराठमोळा लूक अधिकच खुलून दिसत होता. तिचे या लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

राज्यातील 7 कोटी फ्लॅटना मिळणार स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड; फ्लॅटवरील बोजे, कायदेशीर अडचणींचीही होणार नोंद

Panch Mahapurush Yog: कुंडलीतील हे ५ महापुरुष योग देतात राजासारखे सुख! जाणून घ्या त्यांचे महत्त्व आणि ज्योतिषशास्त्रीय फायदे

Maharashtra Zero Bureaucracy: महाराष्ट्रात 'शून्य नोकरशाही' उपक्रमाला सुरुवात! UAE च्या धर्तीवर १७४ डिजिटल सेवांचा शुभारंभ

Todays Gold-Silver Price: सोन्या - चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच! 27 नोव्हेंबरचे नवे दर जाहीर, जाणून घ्या

Numberlogy: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश