शुभंकर एकबोटेने शेअर केली खास पोस्ट (फोटो सौजन्य-सोशल मिडिया) 
Entertainment

Shubhankar Ekbote: ‘ईठा’मध्ये मराठी कलाकारांचा जलवा! सिद्धार्थ जाधवसोबत आणखी एक अभिनेता श्रद्धा कपूरसोबत शेअर करणार स्क्रीन

Shubhankar Ekbote: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ चित्रपटात सिद्धार्थ जाधवसोबत मराठी अभिनेता शुभंकर एकबोटेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्याने पोस्ट शेअर करत व्यक्त केला आनंद.

अमृता यादव

Shubhankar Ekbote: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून अनेक मराठी कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याआधी अभिनेता सिद्धार्थ जाधवही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले होते. आता या चित्रपटात आणखी एका मराठी अभिनेत्याची एंट्री झाली आहे. अभिनेता शुभंकर एकबोटे ‘ईठा’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून, त्याला श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे.

शुभंकर एकबोटेने शेअर केली खास पोस्ट

अभिनेता शुभंकर एकबोटेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत ‘ईठा’ चित्रपटाचा भाग असल्याचा आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्याने चित्रपटातील काही खास क्षण शेअर केले आहेत. तसेच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, लेखक क्षितिज पटवर्धन आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमचे आभार मानले आहेत.

पोस्टमध्ये शुभंकरने लिहिले, “मंडळी! एका लेजेंडरी महान नृत्यांगनेवर आणि लोककलाकाराच्या आयुष्यावर आधारित या महान कलाकृतीचा मला एक छोटासा पण मोलाचा भाग होता आला, यासाठी मी लक्ष्मण उतेकर सर, क्षितिज पटवर्धन दादा आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा कायम मनापासून ऋणी आहे.”

पुढे त्याने आपल्या भूमिकेची तुलना रामायणातील वानरसेनेशी केली. तो म्हणाला की, ज्या प्रकारे रामायणात सागरी सेतू बांधताना वानरसेनेतील प्रत्येक वानराने एकेक दगड टाकून महत्त्वाची कामगिरी केली, त्याचप्रमाणे ‘ईठा’ नावाचा महान सागरी सेतू बांधताना आपल्यालाही एक वानर होण्याची संधी मिळाली. यासाठी आपण स्वतःला भाग्यवान समजत असल्याचेही त्याने म्हटले आहे.

‘ईठा’साठी शुभंकर एकबोटे उत्सुक

शुभंकरने पोस्टमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतही उत्साह व्यक्त केला आहे. ‘ईठा’ हा चित्रपट ४ डिसेंबरपासून जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे त्याने सांगितले. प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्या आणि फेटे उडवण्यासाठी तयार राहावे, असे आवाहनही त्याने केले आहे.

दरम्यान, शुभंकर एकबोटे सध्या अभिनेता सुमीत राघवनसोबत ‘ही दोस्ती तुटायची नाय’ या नाटकात काम करत आहे. याआधी त्याने लक्ष्मण उतेकर यांच्या ‘छावा’ या चित्रपटातही काम केले आहे. आता ‘ईठा’च्या निमित्ताने शुभंकरला श्रद्धा कपूरसोबत काम करण्याची संधी मिळणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. श्रद्धा कपूरचा  'ईठा' चित्रपट ४ डिसेंबरला रिलीज होणार आहे

छोटी MINI,मोठी झेप! BMW ग्रुपच्या विक्रीत मोठा वाटा मिळवण्याची तयारी

Lab grown diamond: लॅब ग्रोन डायमंडला तरुणाईची पसंती, कमी किमतीत मिळतोय हिऱ्यांमध्ये आकर्षक पर्याय!

Kaal Bhairav Jayanti 2026: कधी आहे कालभैरव जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि धार्मिक महत्त्व

Bigg Boss 20 Eviction: ‘बिग बॉस २०’मध्ये १२व्या आठवड्यात मोठा धक्का! माही विज नव्हे, ‘हा’ स्पर्धक घराबाहेर

Bank UPI Transaction : UPI ने 500 रुपयांपर्यंत पेमेंट करताय? देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचा मोठा निर्णय; काय परिणाम होणार?